कोविड रुग्णालयांनी इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST2021-04-17T04:26:52+5:302021-04-17T04:26:52+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ८०० ते ९०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत आहेत. जिल्हा व महापालिका प्रशासनाने कोरोना ...

कोविड रुग्णालयांनी इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट करावे
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज ८०० ते ९०० व्यक्ती पाॅझिटिव्ह येत आहेत. जिल्हा व महापालिका प्रशासनाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी खासगी व शासकीय रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. सध्या शहरात १६ रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या काही दिवसात राज्यातील विविध शहरात कोविड रुग्णालयांना आग लागल्याचा घटना घडल्या आहेत. त्यात काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त कापडणीस यांनी कोविड रुग्णालयांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच सर्व कोविड रुग्णालयांनी सात दिवसात इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडिट करून त्याचा अहवाल महापालिकेकडे सादर करावा. अन्यथा संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
चौकट
विनामास्क ४० जणांवर कारवाई
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या टास्क फोर्सकडून जोरदार कारवाई सुरू आहे. शुक्रवारी विनामास्क फिरणाऱ्या ४० व्यक्तींवर कारवाई करीत ४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या टास्क फोर्समध्ये माजी सैनिकांचा समावेश आहे.
चौकट
शहरात ४७ टक्के लसीकरण
महापालिका क्षेत्रातील खासगी आणि शासकीय अशा २९ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. शुक्रवारी २७१२ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. शुक्रवारअखेर ७८ हजार २६३ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ४५ वर्षावरील ४७ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.