शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेसचे मिरज स्थानकात स्वागत, धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:07 IST

३० नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता ही रेल्वे दररोज धावणार

मिरज : कोल्हापूर, मिरज, कलबुर्गी एक्सप्रेस सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीनुसार, दसरा दिवाळी हंगामासाठी गाडी कोल्हापूर–कलबुर्गी स्पेशल एक्सप्रेस बुधवारी सुरू झाली. मिरज जंक्शन स्थानकात या गाडीचे रेल्वे प्रवासी संघटना व प्रवाशांनी स्वागत केले.क्र. ०१४५१/५२ ही गाडी ३० नोव्हेंबरपर्यंत, शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे. मिरजेतून सकाळी ७:५० वाजता सुटून सोलापूर येथे दुपारी २:३० वाजता आणि कलबुर्गी येथे दुपारी ४:१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी गाडी कलबुर्गी येथून संध्याकाळी ६:१० वाजता सुटेल, सोलापूर येथे रात्री ८:३० वाजता थांबेल आणि मिरजेत पहाटे ३ वाजता पोहोचेल. मिरज–कुर्डुवाडी दरम्यान या गाडीला सर्व स्थानकांत थांबे आहेत. ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवावी तसेच माढा, मोहळ, दुधनी, अक्कलकोट रोड व गाणगापूर रोड येथे थांबा देण्याची व या गाडीला ‘देवदर्शन एक्सप्रेस’ असे नाव देण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली. मिरज स्थानकात गाडीचे चालक पी. डी. चव्हाण व इम्रान मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर भोरावत, सुकुमार पाटील, रेल्वे प्रवासी संस्थेचे संदीप शिंदे, राजेंद्र पाटील, ॲड. अल्लाबक्ष काझी, कुमार पाटील, सोपान भोरावत, बसवंत भोरावत, वाय. सी. कुलकर्णी, राजू पाटील, आनंद राजपूत, रोहित भोरावत, शिवराज राजपूत, निखिल यादव, संतोष भोरावत, प्रशांत कोरे, शिवा भोसले यांच्यासह स्थानक अधीक्षक जी. आर. तांदळे, डी. सॅम्युअल जॉन, मुख्य तिकीट परीक्षक पांडुरंग मराठे आदी उपस्थित होते.धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोयया विशेष गाडीमुळे कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूरचे श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, सोलापूरचे श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, गाणगापूरचे श्री दत्तात्रेय मंदिर व कलबुर्गीतील श्री शरणबसवेश्वर मंदिर या धार्मिक स्थळांच्या दर्शनाची सोय झाल्याचे मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Kalaburagi Express welcomed at Miraj, facilitates religious visits.

Web Summary : Kolhapur-Kalaburagi Express, fulfilling passenger demand, commenced operations for the Dasara-Diwali season. The train facilitates visits to prominent temples in Kolhapur, Pandharpur, Solapur, Akkalkot, Ganagapur and Kalaburagi. Passenger associations request permanent service and renaming it 'Devdarshan Express'.