कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस आता पंढरपूरमार्गे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:23 IST2021-02-15T04:23:51+5:302021-02-15T04:23:51+5:30
गतवर्षी मार्चमध्ये बंद करण्यात आलेली कोल्हापूर-धनबाद पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी कोल्हापूर येथून दि. १९ ...

कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस आता पंढरपूरमार्गे धावणार
गतवर्षी मार्चमध्ये बंद करण्यात आलेली कोल्हापूर-धनबाद पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी कोल्हापूर येथून दि. १९ पासून पहाटे ४.३५ वाजता सुटेल. मिरजेत ५.३० वाजता येऊन ५.३५ वाजता पुढे रवाना होईल. धनबाद येथे तिसऱ्यादिवशी सकाळी ८.३५ वाजता पोहोचेल. ही गाडी दि. २२ पासून धनबाद येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. मिरजेत तिसऱ्यादिवशी सकाळी ११.१५ वाजता येईल व कोल्हापूर येथे दुपारी १२.४० वाजता पोहोचेल. धनबाद एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून, कोल्हापूर, मिरज, पंढरपूर, कुर्डुवाडी, लातूर, नांदेड, अदिलाबाद, नागपूर, इटारसी मार्गे ही एक्स्प्रेस धावणार असल्याने प्रवासाच्या वेळेत १० तासांची बचत होणार आहे. ५० तासांत ही गाडी धनबाद येथे पोहोचणार आहे.