कोल्हापूर-बंगलोर चेन्नम्मा एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:08+5:302020-12-05T05:04:08+5:30

लाॅकडाऊनच्या काळात सहा महिने बंद असलेली चेन्नम्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या वेळेत ...

Kolhapur-Bangalore Chennamma Express will start soon | कोल्हापूर-बंगलोर चेन्नम्मा एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार

कोल्हापूर-बंगलोर चेन्नम्मा एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार

लाॅकडाऊनच्या काळात सहा महिने बंद असलेली चेन्नम्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. चेन्नम्मा एक्स्प्रेसच्या वेळेत धावणारी ही विशेष एक्स्प्रेस आठ दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोयना, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. अद्याप अनेक एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. या सर्व रेल्वेगाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे कोल्हापूर-तिरूपती हरिप्रिया एक्स्प्रेस १६ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर-तिरूपती विशेष रेल्वेस मुदतवाढ मिळाली नसल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Web Title: Kolhapur-Bangalore Chennamma Express will start soon