उन्हा-वाऱ्यात कोकरुड पोलीस नाकाबंदीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:53+5:302021-05-17T04:24:53+5:30
कोकरुड : गेल्या पंधरा दिवसांपासून शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात ऊन, वादळ-वारे, गारांचा पाऊस सुरू आहे. या स्थितीत कोकरुड पोलिसांची ...

उन्हा-वाऱ्यात कोकरुड पोलीस नाकाबंदीवर
कोकरुड : गेल्या पंधरा दिवसांपासून शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात ऊन, वादळ-वारे, गारांचा पाऊस सुरू आहे. या स्थितीत कोकरुड पोलिसांची मात्र तालुक्याच्या हद्दीवर गस्त सुरू आहे.
कोरोनामुळे सर्व जिल्हा हद्दीवर पोलीस बंदोबस्त ठेवून नाकाबंदी करण्यात आली आहे. कोकरुड पोलीस ठाण्याच्या वतीने कोकरुड गावाच्या बाहेर वारणा नदीकाठी; तर मेणी फाटा येथील ओढ्याशेजारी नाकाबंदी सुरू आहे. कामावर या ठिकाणी तात्पुरती पत्र्याची शेड उभी करण्यात आली आहे.
तालुक्यात गेले पंधरा दिवस वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत असतानाही कोकरुड पोलीस नाकाबंदीच्या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पत्र्याच्या शेडमध्येच चोवीस तास सेवा करत आहेत. एवढे करूनही मोठ्या गावात, बाजारपेठेत फेरफटका हा नित्यनियमाने ठरलेला असतो. या वातावरणात कुणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहेत.