अकारण फिरणाऱ्यांवर कोकरुड पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:08+5:302021-04-18T04:25:08+5:30
कोकरुड : ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये कोकरुड पोलीस ठाण्याने २७ जणांवर कारवाई करून चार वाहने ताब्यात ...

अकारण फिरणाऱ्यांवर कोकरुड पोलिसांची कारवाई
कोकरुड : ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये कोकरुड पोलीस ठाण्याने २७ जणांवर कारवाई करून चार वाहने ताब्यात घेतली. कोकरुड पोलीस ठाण्यांतर्गत कोकरुड फाटा येथे नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. प्रमुख मोठी गावे आणि बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त ठेवला असून पोलीस अधिकारी ज्ञानदेव वाघ प्रत्येक गावास भेटी देत आहेत. शुक्रवारी विनामास्क फिरणाऱ्या तीन व्यक्तींवर तीन गुन्हे नोंद केले.
विनाकारण फिरताना आढळून आलेली चार वाहने ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली असून कोणतेही कारण नसताना फिरल्याने दोघावर गुन्हे दाखल केले आहेत. मोटर वाहन कायद्याखाली १७ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ३४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या पाच व्यक्तींवर कारवाई करुन २५० रुपये दंड आकारण्यात आला. एकाच दिवशी २७ जणांसह चार वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती कोकरुड पोलिसांनी दिली.