कोकरूड ग्रामपंचायतीस ‘सुंदर गाव’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:50 IST2021-02-21T04:50:18+5:302021-02-21T04:50:18+5:30

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय आर. आर. पाटील तालुकास्तरीय ‘सुंदर गाव’ प्रथम ...

Kokarud Gram Panchayat 'Sundar Gaon' award | कोकरूड ग्रामपंचायतीस ‘सुंदर गाव’ पुरस्कार

कोकरूड ग्रामपंचायतीस ‘सुंदर गाव’ पुरस्कार

कोकरुड : कोकरूड (ता. शिराळा) ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय आर. आर. पाटील तालुकास्तरीय ‘सुंदर गाव’ प्रथम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कोकरूड ग्रामपंचायतीने २०१९-२०२० मध्ये केलेल्या स्वच्छता अभियान, पाणी पुरवठा व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन आदींसह केलेल्या विकासकामांची दखल घेऊन जिल्हा परिषदने हा पुरस्कार दिला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व खासदार संजयकाका पाटील, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेरवर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सरपंच विलास वाघमारे, उपसरपंच पोपट पाटील, ग्रामविकास अधिकारी रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, नंदकुमार पाटील, बबन मोहिते, मालन घोडे, सुनीता पोतदार, रूपाली घोडे, शुभांगी नांगरे, आयेशा मुलांनी, रमेश पोतदार, तानाजी घोडे, निवास नांगरे उपस्थित होते.

Web Title: Kokarud Gram Panchayat 'Sundar Gaon' award