शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर

By हणमंत पाटील | Published: March 28, 2024 6:32 PM

१६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केले

सांगली : सांगली जिल्हा पूर्वी दक्षिण सातारा म्हणून ओळखला जात होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिली निवडणूक १९५२ साली झाली. त्यावेळी कॉंग्रेसचे व्यंकटराव पवार यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बाळासाहेब पाटील विजयी झाले.१९५७ चा अपवाद वगळता १९५२ ते २००९ या काळात झालेल्या १७ पैकी १६ निवडणुकांमध्ये कॉग्रेस विजयी झाले आहे. शिवाय या १६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केलेले आहे. दरम्यान, २०१४ साली आलेल्या मोदी लाटेत पहिल्यादा कॉंग्रेसचे माजीमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. कॉंग्रेसमधून ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश करूनही २०१४ च्या निवडणुकीत संजय पाटील विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा संजय पाटील यांनी बाजी मारली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत.   

वर्ष - उमेदवार - पक्ष१९५२ - व्यंकटराव पवार - कॉंग्रेस १९५७ - बळवंत ऊर्फ बाळासाहेब पाटील - शेतकरी कामगार पक्ष१९६२ - विजयसिंहराव डफळे - काँग्रेस१९६७ - एस. डी. पाटील  - काँग्रेस१९७१ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस१९७७ - गणपती गोटखिंडे - काँग्रेस१९८० - वसंतदादा पाटील - काँग्रेस१९८३ - शालिनी पाटील - काँग्रेस१९८३ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९८९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९९१ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस१९९६ - मदन पाटील - काँग्रेस१९९८ - मदन पाटील - काँग्रेस१९९९ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस२००४ - प्रकाशबापू पाटील - काँग्रेस२००६ - प्रतीक पाटील - काँग्रेस२००९ - प्रतीक पाटील - काँग्रेस२०१४ - संजय पाटील - भाजप२०१९ - संजय पाटील - भाजप

(१९५७ व १९६२ मध्ये मिरज लोकसभा मतदारसंघ होता. १९८३ व २००६ मध्ये पोटनिवडणूक झाली होती.)

टॅग्स :SangliसांगलीMember of parliamentखासदारPoliticsराजकारण