कीर्तीमालिनीराजे डफळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:29+5:302020-12-11T04:53:29+5:30

जत : भूतपूर्व जत संस्थानच्या राजमाता श्रीमंत कीर्तीमालिनीराजे अजितसिंह डफळे (वय ९८) यांचे बुधवारी रात्री दहाच्यासुमारास येथील ‘अनिलप्रभा’ बंगल्यामध्ये ...

Kirtimalini Raje Daphle passed away | कीर्तीमालिनीराजे डफळे यांचे निधन

कीर्तीमालिनीराजे डफळे यांचे निधन

जत : भूतपूर्व जत संस्थानच्या राजमाता श्रीमंत कीर्तीमालिनीराजे अजितसिंह डफळे (वय ९८) यांचे बुधवारी रात्री दहाच्यासुमारास येथील ‘अनिलप्रभा’ बंगल्यामध्ये वृध्दापकाळाने निधन झाले. जतचे भूतपूर्व संस्थानिक अजितसिंह ऊर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या त्या पत्नी, तर विजयसिंहराजे डफळे यांच्या त्या भावजय होत.

त्यांच्या पश्चात सूनबाई ज्योत्स्नाराजे डफळे, नातू शार्दुलराजे डफळे, नातसून अमृताराजे डफळे आणि दोन नातवंडे असा परिवार आहे.

कीर्तीमालिनीराजे डफळे कुडाळ येथील शिंदे राजघराण्यातील होत्या. त्यांचा जन्म १९२२ मध्ये झाला होता. त्यांचे पती अजितसिंह ऊर्फ भाऊसाहेब महाराज सैन्यदलातील नोकरी सोडून मुंबई पोलिसांत दाखल झाले होते. वरिष्ठ अधिकारी, जतचे संस्थानिक म्हणून त्यांनी अनेकांशी ऋनानुबंध निर्माण केले होते.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जत संस्थानात आणून त्यांची शाही लवाजम्यासह मिरवणूक काढून त्यांचा आदर, सत्कार करण्यात भाऊसाहेब महाराज आणि कीर्तीमालिनीराजे यांचा मोठा वाटा होता. त्यांनी जत येथे महिलांसाठी जिजामाता महिला मंडळाची स्थापना केली होती. या माध्यमातून त्यांनी महिलांना एकत्र आणले होते. कीर्तन महोत्सव भरवून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न केले होते.

गुरुवारी दुपारी छत्रीबाग येथे त्यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शैक्षणिक संस्था बंद ठेवून आदरांजली वाहण्यात आली.

फोटो-१०१२२०२०कीर्तीमालिनीराजे डफळे निधन

Web Title: Kirtimalini Raje Daphle passed away