शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील अपहृत तरुणाची सुटका, गुंडासह दोघांना अटक, दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:41 IST

आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

ठळक मुद्देगुंडासह दोघांना अटक दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्तखुनी हल्ल्याचा बदला

सांगली : आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.

राकेश मधुकर कदम (वय २८, रा. हनुमाननगर, पाचवी गल्ली, सांगली) व सनी विजयकुमार सहानी (२०, मंगळवार बाजार, कुपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आठवड्यापूर्वी त्यांनी श्रीनाथ पंडित याचे मार्केट यार्डमधून अपहरण केले होते. याप्रकरणी त्याची आई सुजाता पंडित यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

गेली आठ दिवस विश्रामबाग पोलिस राकेश कदमचा शोध घेत होते. पण त्याचा सुगावा लागत नव्हता. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख गुंडाविरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.

राकेश कदम हा श्रीनाथला घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यात आश्रयाला असल्याची गुंडाविरोधी पथकाला मिळाली. सोमवारी रात्रीच पथक कवठेमहांकाळला रवाना झाले. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर राकेश कदम हा चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर शेतात लपून बसल्याचीे माहिती मिळाली.

मंगळवारी सकाळी पथकाने या मार्गावरील शेताची तपासणी सुरु केली. त्यावेळी राकेश कदम, त्याचा साथीदार सनी सहानी तसेच एक अल्पवयीन संशयित असे तिघेजण अपहृत श्रीनाथला घेऊन बसल्याचे निदर्शनास आले. पथकाला पाहून राकेशने पलायन केले. त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात यश आले. श्रीनाथला ताब्यात घेतले. राकेशला पथकाने पाठलाग करुन पकडले.

तिघांची अंगझडती घेतल्यानंतर दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, कोयता, सत्तूर या धारदार शस्त्रासह एक जिलेटीन कांडीही सापडली. ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तिघांना घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले.

अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी राकेशसह तिघांची कसून चौकशी केली. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपहृत श्रीनाथला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस निरीक्षक राजन माने, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, हवालदार महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सागर लवटे, योगेश खराडे, सचिन कुंभार, किरण खोत, मोतीराम खोत, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.राकेशचा...राक्या मुंडकं!राकेश कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

कोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ त्याने कऱ्हाड (जि. सातारा) येथील तरुणाचा गळा चिरुन खून केला होता. त्याचे मुंडके कृष्णा नदीत फेकून दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचाही त्याने अशाचप्रकारे धामणी रस्त्यावर खून केला होता. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंडके तोडून दोन्ही खून केल्याचे त्याचे नाव राक्या मुंडकं पडले आहेत.खुनी हल्ल्याचा बदलाअपहृत श्रीनाथच्या भावाने राकेश कदम याच्यावर ६ नोव्हेंबर २०१७ रोजी खुनीहल्ला केला होता. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. गेल्या आठवड्यात त्याने हल्ल्याचे हे प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून श्रीनाथला मार्केट यार्डात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने श्रीनाथचे अपहरण केले. श्रीनाथच्या भावाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण केल्याची कबूली राकेशने दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrimeगुन्हाPoliceपोलिस