शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कसबे डिग्रजजवळ पिता-पुत्रांचे अपहरण करून लूट, ५० लाखांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 16:26 IST

कसबे डिग्रज येथून अपहरण केल्यानंतर जवळील २२ हजार रुपये काढून घेऊन त्यांना इचलकरंजीजवळील माणकापूर येथे सोडण्यात आले.

सांगली : पेठ-सांगली मार्गावर कसबे डिग्रज ते आष्टादरम्यान चाकूच्या धाकाने आठ ते दहा जणांच्या टोळीने पिता-पुत्राचे अपहरण करून लुटले. तब्बल पन्नास लाखांची मागणी करीत दोघांनाही दमदाटी केली. कसबे डिग्रज येथून अपहरण केल्यानंतर जवळील २२ हजार रुपये काढून घेऊन त्यांना इचलकरंजीजवळील माणकापूर येथे सोडण्यात आले. याप्रकरणी शिवाजी यशवंत ढोले (५२, काकाचीवाडी, बागणी, ता. वाळवा) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिक्षक म्हणून कार्यरत असलेले ढोले हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुलगा पीयूषसह दुचाकीने कसबे डिग्रजहून आष्ट्याकडे निघाले होते. या दरम्यानच एक मोटार त्यांना ओव्हरटेक करत आडवी आली. त्यानंतर दुसरी मोटारही बाजूला येऊन थांबली. या वाहनातून आठ ते दहाजण खाली उतरले. त्यांनी पिता-पुत्रांच्या अंगावर गुलाल टाकला. 'गुलाल कसला आहे ते सांगतो' असे म्हणून पिता-पुत्रास मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनाही जबरदस्तीने मोटारीत बसवले.यानंतर ढोले यांच्या खिशातील २२ हजार रुपये काढून घेण्यात आले. दोघांना जिवंत सोडायचे असेल तर ५० लाख रुपये द्या, अशी धमकी दिली. यावर ढोले यांनी पैसे देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना माणकापूर येथे सोडून त्यांची दुचाकी परत केली. यानंतर दोघांनीही सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात आठ ते दहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली. सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड पुढील तपास करत आहेत.

माणकापूरजवळ सोडले

दोघांना माणकापूरजवळ संशयितांनी सोडले. यानंतर त्यांनी पुन्हा फोन करून '५० लाख रुपये आणून द्यायचे नाहीतर पळवून खल्लास करेन' अशी धमकी दिल्याचेही ढोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी