खरिपाच्या उत्पादनाचा पाऊस झाला वैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 22:47 IST2015-08-18T22:47:43+5:302015-08-18T22:47:43+5:30
शेतकरी हवालदिल : तासगावात कृषी विभागाचा शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल; पिके करपली

खरिपाच्या उत्पादनाचा पाऊस झाला वैरी
दत्ता पाटील - तासगाव तालुक्यात खरिपाचा पेरा झालेले ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बहुतांश पिके करपून चालली आहेत. याबाबत तालुका कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज पाहणीत यंदाच्या खरीप पिकांची शून्य टक्के उत्पादकता निश्चित केली असून, याबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. ऐन गरजेच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस आलाच नसता, तर खरिपाच्या खर्चाचा बोजा तरी राहिला नसता, अशी खंत व्यक्त करीत, पाऊस वैरी झाल्याची भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.
तासगाव तालुक्यात मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धांदल करून खरिपाची पेरणी उरकून घेतली. तालुक्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४६ हजार ८५ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ६ हजार ७३८ हेक्टरवर, बाजरी ४०० हेक्टर, मका ४ हजार २५० हेक्टर, तर भुईमुगाची २ हजार ३४५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
खरिपाचा पेरा झाल्यानंतर सातत्याने पावसाने हुलकावणी दिली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर तालुक्यातील शेतकरी नजर लावून बसला होता. मात्र पेरणी केलेले पीक करपून चालल्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा संपुष्टात आलेली आहे. पिकापासून उत्पादन राहिले, किमान चारा उपलब्ध होईल, याचीही आता शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च आणि वाया गेलेले पीक, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
खरिपाच्या उत्पादनाचा पाऊस झाला वैरी
शेतकरी हवालदिल : तासगावात कृषी विभागाचा शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल; पिके करपली
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव तालुक्यात खरिपाचा पेरा झालेले ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्र पावसाअभावी वाया गेल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बहुतांश पिके करपून चालली आहेत. याबाबत तालुका कृषी विभागाने केलेल्या नजरअंदाज पाहणीत यंदाच्या खरीप पिकांची शून्य टक्के उत्पादकता निश्चित केली असून, याबाबतचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. ऐन गरजेच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. मान्सूनच्या सुरुवातीला पाऊस आलाच नसता, तर खरिपाच्या खर्चाचा बोजा तरी राहिला नसता, अशी खंत व्यक्त करीत, पाऊस वैरी झाल्याची भावनाही शेतकरी व्यक्त करत आहेत.
तासगाव तालुक्यात मान्सूनच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी धांदल करून खरिपाची पेरणी उरकून घेतली. तालुक्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र ४६ हजार ८५ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ४० हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनची ६ हजार ७३८ हेक्टरवर, बाजरी ४०० हेक्टर, मका ४ हजार २५० हेक्टर, तर भुईमुगाची २ हजार ३४५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
खरिपाचा पेरा झाल्यानंतर सातत्याने पावसाने हुलकावणी दिली. आज ना उद्या पाऊस येईल, या आशेवर तालुक्यातील शेतकरी नजर लावून बसला होता. मात्र पेरणी केलेले पीक करपून चालल्यामुळे शेतकऱ्यांची उरलीसुरली आशा संपुष्टात आलेली आहे. पिकापासून उत्पादन राहिले, किमान चारा उपलब्ध होईल, याचीही आता शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे खरिपासाठी केलेला खर्च आणि वाया गेलेले पीक, याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
कडधान्याचा पालापाचोळा; चाराटंचाई
तालुक्यात तूर, उडीद, मुगासह इतर कडधान्यांची तीन हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कमी काळात कडधान्यांचे उत्पादन घेता येत होते; मात्र पावसाअभावी बहुतांश कडधान्यांचा पालापाचोळाच झाल्याचे चित्र तालुक्यात सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.
तालुक्यात सर्वाधिक ज्वारी पिकाची २२ हजार ४०० हेक्टरवर, तर मका पिकाचीही चार हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र ही पिके करपून गेल्यामुळे यावर्षी चारा उपलब्ध होणार कसा? असा प्रश्न आतापासूनच शेतकऱ्यांसमोर उभा असून, पावसाअभावी चाराटंचाई भेडसावणार आहे.
तालुका कृषी विभागामार्फत पिकांची सद्यस्थिती पाहून शून्य टक्के उत्पादनाचा नजरअंदाज अहवाल सादर केला आहे. सप्टेंबर महिन्यात पीक कापणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत १६, पंचायत समितीमार्फत १५, तर महसूल विभागामार्फत ३१ अशा एकूण ६२ प्लॉटस्मध्ये पीक कापणी करून, अहवाल सादर करण्यात येणार आहे.