कास्ट्राईब जि. प. कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बनसोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:26 AM2020-12-31T04:26:19+5:302020-12-31T04:26:19+5:30

सांगली : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बनसोडे यांची एकमताने निवड केली. निवडीनंतर वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष तथा ...

Kastrib Dist. W. Deepak Bansode as the District President of the Employees Union | कास्ट्राईब जि. प. कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बनसोडे

कास्ट्राईब जि. प. कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बनसोडे

Next

सांगली : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक बनसोडे यांची एकमताने निवड केली. निवडीनंतर वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हाध्यक्ष गणेश मडावी यांनी सत्कार केला.

दीपक बनसोडे यांनी यापूर्वी कास्ट्राईब संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष म्हणून उत्कृष्टरित्या काम पाहिले आहे. ते सध्या ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषदेत कार्यरत आहे. बनसोडे म्हणाले, माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना संघटित करून संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीकडील कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय पातळीवरील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी महासंघाचे सचिव बाबासाहेब माने, जिल्हा परिषद शाखा कार्याध्यक्ष अरुण मोरे, सचिव रमेश सोनवणे, कोषाध्यक्ष सुलोचना खंदारे, उपाध्यक्ष शिवाजी जोशी, गणेश पवार, संघटक सचिव रामचंद्र टोणे, प्रशांत भंडारे, कार्यकारिणी सदस्य अनिल धनवडे, सिधू कोळी, प्रमोद लोकापुरे, मच्छिंद्र दाते आदी उपस्थित होते.

Web Title: Kastrib Dist. W. Deepak Bansode as the District President of the Employees Union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.