कसबे डिग्रजला ऊसतोडणी मुकादमाकडून एकास गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:27 IST2021-04-17T04:27:21+5:302021-04-17T04:27:21+5:30
सांगली : कसबे डिग्रज (ता.मिरज) येथे ऊसगळीत हंगामामध्ये केलेल्या कराराप्रमाणे कामगार न पुरवता, एकाची चार लाख ३३ हजार ९३ ...

कसबे डिग्रजला ऊसतोडणी मुकादमाकडून एकास गंडा
सांगली : कसबे डिग्रज (ता.मिरज) येथे ऊसगळीत हंगामामध्ये केलेल्या कराराप्रमाणे कामगार न पुरवता, एकाची चार लाख ३३ हजार ९३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विजय किसन जाधव (रा.कसबेडिग्रज) यांनी किसन सीताराम चव्हाण, कमलाबाई किसन चव्हाण (दोघेही रा.कवठपिरान आमणी बुद्रुक) यांच्याविरोधात ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सप्टेंबर, २०१९ ते डिसेंबर, २०१९ या कालावधीत संशयितांनी ऊस गाळप हंगामाच्या वेळी ऊसतोड मजुरांची कमी पुरवठा केला होता. कामगार पुरविण्यासाठी जाधव यांनी ७ लाख ९८ हजार ५०० रुपये दिले होते. त्यातील ३ लाख ६५ हजार ४०७ रुपये ऊसतोडणी करून व रोखीने परत दिले असले, तरी उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे.