विजय पिसे यांना ‘कामगार भुषण’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:21+5:302021-02-17T04:33:21+5:30

सावंतपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा ‘कामगार भूषण’ पुरस्कार विजय भूपाल पिसे यांना कामगार मंत्री दिलीप ...

'Kamgar Bhushan' award to Vijay Pise | विजय पिसे यांना ‘कामगार भुषण’ पुरस्कार

विजय पिसे यांना ‘कामगार भुषण’ पुरस्कार

सावंतपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा ‘कामगार भूषण’ पुरस्कार विजय भूपाल पिसे यांना कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास कामगार राज्यमंत्री बच्चू कडू, प्रधान सचिव विनिता वेद-सिंधल उपस्थित होते.

कामगार भूषण पुरस्कारप्राप्त विजय पिसे हे किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे कर्मचारी आहेत. पंचवीस हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे किर्लोस्करच्या १३० वर्षांच्या इतिहासातील पिसे हे पहिले कामगार ठरले आहेत.

सांगली जिल्ह्याला प्रथमच ‘महाराष्ट्र कामगार भूषण’ पुरस्काराचे मानकरी होऊन, सांगली जिल्ह्याच्या वैभवात भर घातल्याबद्दल पलूस तालुका नामदेव शिंपी समाजातर्फे पिसे यांचे अभिनंदन करण्यात आले. साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रातील योगदानासाठी हे पुरस्कार दिले जातात.

फाेटाे : १६ सावंतपूर २

Web Title: 'Kamgar Bhushan' award to Vijay Pise