कामेरीत भाजीमंडई, सार्वजनिक कार्यक्रम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:26 IST2021-04-17T04:26:55+5:302021-04-17T04:26:55+5:30
सरपंच स्वप्नाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सुनील पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदूकाका पाटील, वैद्यकीय अधिकार, डॉ. नितीन चिवटे ...

कामेरीत भाजीमंडई, सार्वजनिक कार्यक्रम बंद
सरपंच स्वप्नाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व सुनील पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नंदूकाका पाटील, वैद्यकीय अधिकार, डॉ. नितीन चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
गावात सध्या ३० पेक्षा जास्त कोरोनाबाधित असून, एकाचा बुधवारी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात ही बैठक झाली. गरज पडल्यास सोमवारपासून संपूर्ण गाव लॉकडाऊन करणे, लसीकरण वाढविण्यासाठी जनजागृती करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना समितीमार्फत दोन वेळा चहा, नाश्ता व्यवस्था करणे, लसीकरण नोंदणीसाठी ग्रामपंचायतीमार्फत दोन संगणक व डेटा ऑपरेटर देणे, कोरोनाबाधित होम आयसोलेशनचे नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर पोलीस कारवाई करणे व संस्थात्मक क्वारंटाइनचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी आनंदराव पवार यांनी दिली.
यावेळी तलाठी आर. बी. शिंदे, दिनेश जाधव, अशोक कुंभार, बंडाकाका पाटील उपस्थित होते.