शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सांगलीच्या काजलने फडकावला कठीण 'डांग्या सुळक्या'वर तिरंगा, महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 17:15 IST

एका पायाने दिव्यांग असलेल्या काजलसाठी हे मोठे आव्हान होते, तरीही आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर तिने सर केले.

सांगली : सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे हिने नाशिक जिल्ह्यातील डांग्या सुळका यशस्वीरित्या सर केला. कठीण श्रेणीतील हा सुळका सर करणारी महाराष्ट्रातील ती पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.मनाचा थरकाप आणि काळजाची धडधड वाढवणारे सह्याद्रीचे रूप म्हणजे नाशकातील सुळके. इगतपुरी तालुक्यात दहेगावजवळील कठीण श्रेणीतील डांग्या सुळका. गिर्यारोहकांसाठी नेहमीच आव्हान समजला जातो. १८ डिसेंबर रोजी गिर्यारोहकांच्या पथकाने डांग्या सुळका आरोहन मोहीम आयोजित केली होती. त्यामध्ये सांगलीच्या दिव्यांग काजलने सहभाग घेतला. सकाळी सप्रेवाडी गावातून सुरुवात झाली. सुमारे २०० फूट उंच सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर प्रत्येकाने एका वेळी एक अशी चढाई सुरू केली.एका पायाने दिव्यांग असलेल्या काजलसाठी हे मोठे आव्हान होते, तरीही आत्मविश्वास आणि अनुभवाच्या जोरावर तिने सर केले. माथ्यावर पोहोचल्यावर तिरंगा फडकवत ‘भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.या मोहिमेसाठी काजलला जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, डॉ. समीर भिसे, राजश्री चौधरी, भरत, ज्ञानू आदींनी मार्गदर्शन व सहकार्य केले. मोहिमेत काजलसह शिवाजी जाधव, अथर्व शेटे, विजय मेटकरी, सुहास कातळकर, डॉ. समीर भिसे आदी गिर्यारोहकांचा सहभाग होता.काजलने यापूर्वीही कळसुबाई शिखरासह अनेक गड, किल्ले सर केले आहेत. वजीर, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगडसारखे कठीण सुळके, गड सर केले आहेत.

टॅग्स :Sangliसांगली