कडेपूर सोसायटी सभासदांचे हित जोपासणारी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:02+5:302021-09-12T04:30:02+5:30

ओळी : कडेपूर सर्व सेवा सोसायटीतर्फे अध्यक्ष भीमराव यादव, ज्येष्ठ नेते सयाजीराव देशमुख यांच्याहस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले. ...

Kadepur Society is an organization that caters to the interests of its members | कडेपूर सोसायटी सभासदांचे हित जोपासणारी संस्था

कडेपूर सोसायटी सभासदांचे हित जोपासणारी संस्था

ओळी : कडेपूर सर्व सेवा सोसायटीतर्फे अध्यक्ष भीमराव यादव, ज्येष्ठ नेते सयाजीराव देशमुख यांच्याहस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेपूर : कडेपूर (ता. कडेगाव) येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीने सभासदांना ५ टक्के लाभांश वाटप केला आहे. सभासदांना केंद्रबिंदू मानून आणि सभासदांचे हित जोपासत संस्थेची प्रगती उंचावली आहे. संस्थेने लाभांश वाटप करून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे, असे प्रतिपादन संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सयाजीराव देशमुख यांनी केले.

कडेपूर (ता. कडेगाव) येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने सभासदांना लाभांश वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष भीमराव यादव अध्यक्षस्थानी होते.

यावेळी जिल्हा बँकेचे शाखाधिकारी वैभव महाजन, फिल्ड ऑफिसर हणमंतराव पाटील, सूर्याजी यादव, महावीर वाघमारे, वैभव यादव प्रमुख उपस्थित होते.

सचिव वैभव देसाई यांनी संस्थेचा आर्थिक लेखाजोखा सभेपुढे मांडला. संस्थेची बॅंक पातळीवर शंभर टक्के, तर सभासद पातळीवर ८१ टक्के वसुली झाली आहे.

कार्यक्रमास शंकर यादव, विलासराव यादव, बाळासाहेब यादव, दिलीप यादव, सुनील कोळी, आप्पासाहेब यादव, बाळासाहेब यादव, दिलीप कणसे, शब्बीर मुलाणी, जगन्नाथ जंगम यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष भीमराव यादव यांनी स्वागत केले. संचालक संग्राम यादव यांनी आभार मानले.

चौकट

दाेन वेळा लाभांश

कडेपूर सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाने सभासदांना दोन वेळा लाभांश दिला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षातील नफ्यावर ५ टक्केप्रमाणे लाभांश दिला आहे. तसेच २०२१-२२ चे लेखापरीक्षण झाल्यावर सभासदांना लाभांश देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भीमराव यादव यांनी सांगितले.

Web Title: Kadepur Society is an organization that caters to the interests of its members