वाळव्यात कबड्डी स्पर्धा सुरू

By Admin | Updated: December 25, 2014 00:10 IST2014-12-24T23:39:11+5:302014-12-25T00:10:35+5:30

पाच जिल्ह्यांचे संघ दाखल: कोल्हापूरवर सांगलीचा विजय

Kabaddi competition in the desert started | वाळव्यात कबड्डी स्पर्धा सुरू

वाळव्यात कबड्डी स्पर्धा सुरू

वाळवा : येथील हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय पायका कबड्डी निवड स्पर्धेला प्रारंभ झाला. किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी उदघाटन केले.
कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील मुला-मुलींचे संघ वाळवा येथे दाखल झाले आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांची वाळव्यात याच क्रीडानगरी मैदानावर दि. २६ ते दि. २८ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय पायका कबड्डी स्पर्धेसाठी निवड होणार आहे.
उदघाटनाचा सामना कोल्हापूर विरुध्द सातारा संघात लावण्यात आला. यामध्ये कोल्हापूरच्या संघाने तीस गुणांनी सातारा संघास हरविले. यावेळी जिल्हा सहायक क्रीडा अधिकारी शंकर भास्करे, विभागीय निवड समितीचे सदस्य दीपक पाटील, मुख्याध्यापक एस. पी. होरे, मुख्याध्यापिका सौ. एस. व्ही. कांबळे, जयवंत अहिर, बाळासाहेब कदम, अजित वाजे, सरपंच गौरव नायकवडी, उपस्थित होते. विकास शिंदे यांनी स्वागत केले. आर. एम. मुल्ला यांनी आभार मानले. (वार्ताहर)

Web Title: Kabaddi competition in the desert started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.