शहरं
Join us  
Trending Stories
1
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
2
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
3
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
4
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
5
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
6
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
7
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
8
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
9
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
10
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
11
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
12
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
13
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
14
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
15
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
16
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
17
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
18
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
19
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
20
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli-Local Body Election: विकास झाला गायब, नुसतीच चिखलफेक; प्रचारातील भाषा घसरू लागली

By संतोष भिसे | Updated: November 25, 2025 19:01 IST

उणीदुणी काढण्यावरच भर 

संतोष भिसेसांगली : नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत प्रचारासाठी फारच थोडा कालावधी असल्याने उमेदवारांची धांदल उडाली आहे. रात्र थोडी आणि सोंगे फार अशी त्यांची अवस्था झाली आहे. प्रचाराच्या या धांदलीत विकासाचे मुद्दे गायब झाले असून, मी चांगला आणि विरोधक वाईट हेच पटवून सांगण्याची अहमहमिका लागली आहे.जिल्ह्यातील सर्वच म्हणजे आठही नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींत काटाजोड लढती दिसत आहेत. विशेषत: जत, आटपाडी, ईश्वरपूर, पलूस, विटा येथे राजकीय अस्तित्वाच्या लढती दिसून येत आहेत. नगरसेवक पदासोबतच नगराध्यक्षपदासाठीही नेतेमंडळींनी कंबर कसली आहे. त्यामुळे तर राजकीय संघर्ष अधिकच टोकदार झाला आहे. पहिल्या टप्प्यात शहराच्या विकासाच्या गोष्टी करणारा प्रचार आता एकमेकांची उणीदुणी काढण्यावर गेला आहे. प्रचाराच्या भाषेत आता शिवराळपणा येऊ लागला आहे.

ही पाहा तुमच्या भावी नगरसेवकाची मुक्ताफळेजतच्या एका नेत्याला थेट मूर्ख आणि थापाड्या ठरविण्यात आले आहे. तासगावच्या प्रचारात धनशक्तीचा उल्लेख वारंवार सुरू आहे. विट्याच्या निवडणुकीत एकाधिकारशाहीचा मुद्दा उचलला जात आहे. गावागावांत भांडणे लावण्याचा उद्योग सुरू असल्याचीही टीका सुरू आहे....तर प्रत्येक शहर सिंगापूर बनेलउमेदवारांचे, आघाड्यांचे जाहीरनामे फक्त कागदावरच दिसत आहेत. या जाहीरनाम्यांची १०० टक्के अमंलबजावणी केली, तर प्रत्येक शहर सिंगापूर बनल्याशिवाय राहणार नाही. जाहीरनाम्यातील योजना इतक्या गोडगुलाबी आहेत, की उमेदवारांच्या कल्पकतेचे कौतुकच करावेसे वाटल्यावाचून राहत नाही. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकापासून स्मशानात पोहोचलेल्या मृतापर्यंत प्रत्येकासाठी काही ना काही तरतूद जाहीरनाम्यात केली आहे.

‘एकदा सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवतो’‘एकदा सत्ता द्या, विकास काय असतो ते दाखवतो’ अशा वल्गना सर्वच नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारात ऐकायला मिळत आहेत. अर्थात, आजवरचा राजकीय इतिहास पाहता उमेदवारांच्या या वल्गना कधीच खऱ्या ठरलेल्या नाहीत. विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर गायब झालेला उमेदवार पुढच्या निवडणुकीलाच प्रभागात उगवतो हा मतदारांचा अनुभव आहे.

एकसारख्या समस्या, एकसारखी आश्वासनेईश्वरपूरपासून जतपर्यंत आणि शिराळ्यापासून विट्यापर्यंतच्या प्रत्येक शहरातील समस्या थोड्याफार फरकाने एकसारख्याच आहेत. वाहतुकीची कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या, अतिक्रमणे, उखडलेले रस्ते या तक्रारी सर्वत्र आहेत. ‘शहराचे सिंगापूर करतो’ अशा बाता मारणाऱ्या कारभाऱ्यांना सत्तेत गेल्यानंतर या समस्या आजवर कधीच दिसलेल्या नाहीत. टक्केवारीची कीड तर सर्वत्रच आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Local Elections: Development Vanishes, Mud Flies, Language Declines

Web Summary : Sangli local elections see candidates focusing on criticizing opponents instead of development. Promises abound, but past performance is questionable. Similar issues plague all cities, with familiar unfulfilled assurances.