गूळ मोदकांना मिळाला नऊ हजारावर दर!

By Admin | Updated: December 25, 2014 00:01 IST2014-12-24T23:35:06+5:302014-12-25T00:01:06+5:30

रव्यांना मात्र जेमतेमच दर : शेतकऱ्यांचे डोळे कारखान्यांच्या ऊस दराकडे

Jokes got nine thousand rupees! | गूळ मोदकांना मिळाला नऊ हजारावर दर!

गूळ मोदकांना मिळाला नऊ हजारावर दर!

सहदेव खोत -पुनवत -शिराळा तालुक्यातील कणदूर येथील भगवान शंकर पाटील यांच्या पंचवीस किलोच्या गूळ मोदकांना कऱ्हाडच्या बाजारपेठेत प्रति क्विंटल ९१०० रुपये दर मिळाला. भाटवडेकर यांच्या दुकानात या गुळाचा सौदा नुकताच झाला. दुसरीकडे गूळ रव्यांच्या दरात मात्र फारशी प्रगती नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
शिराळा तालुक्यात उत्पादित गुळाला महिन्याभरात अपेक्षित दर मिळालेला नाही. सध्या तालुक्यात सुमारे ४० गुऱ्हाळघरांतून गुळाचे उत्पादन सुरू आहे. यंदा उसाचा प्रतिटन दर अद्याप ठरला नसल्याने गूळ दरावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
हंगामाच्या सुरुवातीच्या महिन्यात १८०० पासून ते २६००, २००० असा दर मिळाला आहे. गुऱ्हाळभाडे आदणाला २००० रुपयांच्या घरात असल्याने गुऱ्हाळातील गळीत शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळ गळिताकडे
पाठ फिरवली. कोल्हापूर जिल्ह्यात गुळाच्या हमीभावासाठी आंदोलन होऊनही कऱ्हाड, कोल्हापूर बाजारपेठेत गूळ दरात फारशी वृद्धी झालेली नाही.
कणदूर येथील गुऱ्हाळमालक शेतकरी भगवान शंकर पाटील यांनी कऱ्हाड बाजारपेठेत पाठविलेल्या २५ किलोच्या गूळ मोदकांना ९१०० इतका उच्चांकी भाव मिळाला.

चांगल्या दर्जाचा गूळ बनविण्यासाठी ९-१० उतारा मिळणारा ऊस लागतो. सध्या गुऱ्हाळात येणाऱ्या उसाचा उतारा ५ ते ७ च्या दरम्यान असल्याने उत्तम प्रतीचा गूळ बनत नसल्याचे अनेक गुऱ्हाळमालकांचे म्हणणे आहे.


उत्तम रंग, कणी व चवीचा गूळ बाजारपेठेत आल्यास शेतकऱ्यांना सरासरी ३५०० व त्यापेक्षाही जादा दर मिळणे शक्य आहे. साधारण संक्रांतीनंतर गूळ दरात अपेक्षित वाढ होईल, असे चित्र आहे.
- उत्तमराव जाधव, गूळ व्यापारी, कऱ्हाड

Web Title: Jokes got nine thousand rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.