शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी, गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 13:43 IST

Accident Sangli Crimenews- औढी ( ता.शिराळा) येथे जीप व होंडा सिटी यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले आहेत. तसेच होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. या अपघातानंतर होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. याबाबत विनापरवाना स्फोटके ठेवल्याबद्दल व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडला.

ठळक मुद्देजीप -होंडासिटीत समोरासमोर धडक, पाच जण जखमी गाडीमध्ये जिलेटीनच्या तीन कांड्या

शिराळा : औढी ( ता.शिराळा) येथे जीप व होंडा सिटी यांची समोरासमोर धडक होऊन पाच जण जखमी झाले आहेत. तसेच होंडा सिटी गाडीमध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. या अपघातानंतर होंडा सिटीचा चालक पळून गेला आहे. याबाबत विनापरवाना स्फोटके ठेवल्याबद्दल व अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात सोमवार दि.५ रोजी रात्री ८ च्या दरम्यान घडला.याबाबत माहिती अशी की , जीप ( क्रमांक एम एच ०४- क्यू ५९१८) ही जीप करमाळे हुन शिराळा कडे तर होंडा सिटी ही( एम एच ०१ वायए २४४९) शिराळा कडून करमाळे कडे निघाला होती. होंडा सिटी चालक वेगाने येऊन जीप गाडीस धडक दिली. ही धडक बसताच होंडा सिटी चालक पळून गेला. ही धडक एवढी जोरात होती की जीप गाडी पलटी झाली. यामध्ये जीप मधील फिर्यादी बबन बाळू पाटील , हणमंत मोहिते , राजाराम कदम , भानुदास माने , भगवान माने (सर्व रा.करमाळे ता.शिराळा) हे पाच जण जखमी झाले आहेत.या जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या अपघातानंतर होंडा सिटी चालक पळून गेला. या गाडीची तपासणी करत असताना त्यामध्ये जिलेटीन या स्फोटकाच्या तीन कांड्या सापडल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत व विनापरवाना स्फोटके बाळगल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाडेकर व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीSangliसांगलीshirala-acशिराळाPoliceपोलिस