शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

Sangli: ट्रॅव्हल्स बसला जीपची धडक; कर्नाटकच्या चौघी ठार, १२ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 18:20 IST

लग्नासाठी निघालेल्या वाहनांची धडक

ढालगाव : जांभूळवाडी (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे ट्रॅव्हल बसला जीपने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सात जण ठार झाले. अकरा जण जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. मृत व जखमी कर्नाटकातील बागलकोट व विजापूर जिल्ह्यातील आहेत.जमखंडी (जि. बागलकोट) येथून एक ट्रॅव्हल बस, क्रूझर जीप व एक कार अशी तीन वाहने सांगली जिल्ह्यातील सावर्डे (ता. तासगाव) येथे लग्नासाठी निघाली होती. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर जांभूळवाडी फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे आल्यानंतर जीपने ट्रॅव्हल बसला मागून जोराची धडक दिली. त्यात जीपचा चक्काचूर होऊन पाच जण जागीच ठार झाले. दोघा गंभीर जखमींचा मिरजेला उपचारास नेताना वाटेतच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मृतांची नावे समजू शकली नाहीत. अपघातात जीप व ट्रॅव्हल बसमधील एकूण ११ लोक जखमी झाले आहेत. यामध्ये रघुनाथ आण्णाप्पा सव्वाशे (रा. बिद्री), सतीश हवालदार, जानू वर्णा हवालदार, संकेत हवालदार (वय ८), संतोष हवालदार (वय १०), समर्थ हवालदार (९ वर्षे, सर्व रा. कौलगी, विजापूर), शिवाजी जाधव (२१), सुश्मिता संगापूर (२१, दोघे रा. तोगलबागी, ता. जमखंडी), सुजाता गळवे (२४, रा. अडीहुडी, ता. जमखंडी), सुमय्या मुल्ला (१९, चिकलगी, ता. जमखंडी), निवेदिता मुधोळ (१९, रा. मुधोळ, महालिंगपूर) यांचा समावेश आहे. दहा जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांकडून मदतकार्यअपघाताची माहिती कळताच चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथील दत्तात्रय लोखंडे, अविनाश यमगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावून मदतकार्य केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू