शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

जयश्रीताईंना योग्य ती संधी देऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 15:50 IST

काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरण

सांगली : पश्चिम महाराष्ट्रातून मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा होती. सांगली जिल्ह्यातील जे मोठे घराणे यायचे होते, ते आलेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या जयश्रीताई पाटील यांना योग्य संधी दिली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ नेते शेखर इनामदार, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदी उपस्थित होते.

माजी महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांचा प्रवेशमाजी महापौर किशोर शहा, किशोर जामदार, कांचनताई कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, प्रशांत पाटील-मजलेकर, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, संतोष पाटील, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, करण जामदार, अजित सूर्यवंशी, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, सुभाष यादव, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सुनील जाधव, माजी सरपंच निवास पाटील, तानाजी पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब पाटील, मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे, शीतल लोंढे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षप्रवेशाचा हा चमत्कार भाजपचे नेते शेखर इनामदार व जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांच्यामुळे झाला.

दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून काँग्रेस नेते पक्ष सोडतातभाजपने विरोधी पक्षात असतानाही कधीही देशहित आणि समाजहिताचा विचार सोडला नाही, मात्र विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचे नेतृत्व हे दिशाहीन आहे. नेत्यांचे खच्चीकरण होत असल्याने आज अनेक काँग्रेस नेते पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

काँग्रेसकडून जयश्रीताईंचे खच्चीकरणफडणवीस यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांच्या लोकहिताच्या अनेक निर्णयांचे स्मरण केले. वसंतदादांच्या समाजकार्याचा वारसा जयश्रीताई पुढे चालवत आहेत. काँग्रेसने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही. मात्र, भाजप परिवारामध्ये त्यांची आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

भाजपमध्ये सन्मानजनक वागणूक मिळेल : जयश्रीताई पाटीलमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याच्या, सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करत आहोत. भाजपमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक मिळेल, याची खात्री आहे, असेही जयश्रीताई पाटील यावेळी म्हणाल्या.