शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जयश्री पाटील यांना लवकरच महामंडळ - गृह राज्यमंत्री सतेज पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 11:58 IST

जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्याचा शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला होता, मात्र तो अद्याप पाळलेला नाही.

सांगली : काँग्रेस नेत्या व जिल्हा बॅँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांना लवकरच शासनाकडून महामंडळ मिळेल. मी स्वत: यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रयत्न करीत आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी मदनभाऊ युवा मंचच्या कार्यकर्त्यांना दिली.मंत्री पाटील यांनी मंगळवारी जयश्रीताई पाटील यांच्या घरी भेट दिली. जयश्रीताई पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक विशाल पाटील, प्रा. सिकंदर जमादार, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, संग्राम पाटील आदी उपस्थित होते. मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे यांनी मंत्री पाटील यांचा सत्कार केला.जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्याचा शब्द काँग्रेस श्रेष्ठींनी दिला होता, मात्र तो अद्याप पाळलेला नाही. राज्यात सत्तेच तसेच पक्षसंघटनेतही जयश्रीताई पाटील यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नसल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणूक तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर मदनभाऊ गटाच्या कार्यकर्त्यांना पक्षाने ताकद दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आली.मंत्री पाटील म्हणाले की, जयश्रीताई पाटील यांना महामंडळ देण्यासाठी मी स्वत: प्रदेश श्रेष्ठींकडे शिफारस करणार आहे. याबाबतच निर्णयही झाला आहे. मात्र, ज्यावेळी महामंडळाच्या नियुक्त्या सुरू होतील त्यावेळी पाटील यांना नक्की संधी मिळेल. लवकरच महामंडळाच्या नियुक्त्या सरकार करणार आहे. मदनभाऊ पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ताकद देण्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे.यावेळी नगरसेवक संतोष पाटील, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, उत्तम साखळकर, तौफिक शिकलगार, संजय कांबळे, शीतल लोंढे, अमित लाळगे, अमोल झांबरे, उदय पाटील, मयूर बांगर, प्रवीण निकम, अवधूत गवळी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील