शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेता निवडीचे अधिकार जयंतरावांना!

By admin | Updated: December 22, 2016 23:43 IST

दोन दिवसात निर्णय : राष्ट्रवादीतील सहाजण इच्छुक

सांगली : महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्यावर सोपविण्यात आला. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जयंत पाटील घेतील तो निर्णय मान्य करण्याचे आश्वासनही नगरसेवकांनी बैठकीत दिले. विरोधी पक्षनेतेपदासाठी विष्णू माने, राजू गवळी, शेडजी मोहिते, युवराज गायकवाड, मैनुद्दीन बागवान, शुभांगी देवमाने यांनी दावा केला आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला स्थायी समितीच्या सभापती संगीता हारगे, मावळते विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, राजू गवळी, युवराज गायकवाड, शेडजी मोहिते यांच्यासह पक्षाचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते. दिग्विजय सूर्यवंशी यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा महापौर हारुण शिकलगार यांच्याकडे सोपविला आहे. गेली साडेतीन वर्षे ते या पदावर कार्यरत होते. दोन दिवसांपूर्वी आमदार जयंत पाटील यांनी दूरध्वनीवरून सूर्यवंशी यांना राजीनाम्याचे आदेश दिले होते. अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. सूर्यवंशी यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाअंतर्गत हालचाली सुरू होत्या. जयंत पाटील यांनी बदल करण्याचे आश्वासनही दिले होते, पण जसजसा कालावधी वाढू लागला, तसे इच्छुकांत निराशाही पसरली होती. गुरुवारी झालेल्या बैठकीत सर्वच नगरसेवकांची मते आजमाविण्यात आली. सर्वच नगरसेवकांनी विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड करायची, याचे अधिकार जयंत पाटील यांना दिले. त्यांचा निर्णय सर्वमान्य असेल. बैठकीत सहाजणांनी पदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांची नावे जयंत पाटील यांना कळविली जातील, असे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बैठकीला तिघे गैरहजरमहापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ व सहा सहयोगी असे २५ सदस्य आहेत. यापैकी सहयोगी सदस्य धनपाल खोत, सुलोचना खोत, अनिता आलदर हे तीन सदस्य गैरहजर होते, तर सध्या उपमहापौर गटात सहभागी असलेल्या शुभांगी देवमाने यांनी मात्र बैठकीला हजेरी लावली होती. शेडजी मोहिते, गवळींनी घेतली भेटइच्छुक शेडजी मोहिते, राजू गवळी यांनी सांयकाळी इस्लामपूर येथे जयंत पाटील यांची भेट घेतली. १८ नगरसेवकांनी शेडजी मोहिते यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. येत्या दोन दिवसांत विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा करू, असे आ. पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी जयंत पाटील सांगलीत येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत इतर इच्छुक त्यांना भेटून साकडे घालण्याची शक्यता आहे.