कवठेमहांकाळ शहरात जयंत थाळीची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:20 IST2021-06-04T04:20:58+5:302021-06-04T04:20:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कवठेमहांकाळ : तालुक्यातील शंतनू सगरे मित्र परिवाराच्यावतीने गुरुवारी कवठेमहांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे जयंत थाळीची सुरुवात ...

Jayant Thali begins in Kavathemahankal city | कवठेमहांकाळ शहरात जयंत थाळीची सुरुवात

कवठेमहांकाळ शहरात जयंत थाळीची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : तालुक्यातील शंतनू सगरे मित्र परिवाराच्यावतीने गुरुवारी कवठेमहांकाळ शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे जयंत थाळीची सुरुवात करण्यात आली.

उपजिल्हा रुग्णालय येथे प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते जयंत थाळीचे वितरण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना जयंत थाळी रोज देण्यात येणार आहे. प्रतीक पाटील म्हणाले की, शंतनू सगरे परिवाराने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, शंतून सगरे, माजी सभापती दत्ताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मोहन खोत, प्रा. अमोल वाघमारे उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सौरभ ओलेकर, तालुकाध्यक्ष सोमनाथ टोने, उपसरपंच विजय पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Web Title: Jayant Thali begins in Kavathemahankal city