शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेध, सांगलीत निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:35 IST

आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देभाजयुमोतर्फे जयंत पाटील यांचा निषेधसांगलीत निदर्शने : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सांगली : आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटर्सबाबत खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चातर्फे शनिवारी सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. पालकमंत्र्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.भाजयुमोचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोना महामारीने सांगलीमध्ये भीषण स्वरूप धारण केले आहे.

सध्या सांगलीमध्ये शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये बेड व व्हेंटीलेटरची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांचे उपचाराअभावी मृत्यू होत आहेत. याबाबत भाजपा युवा मोर्चाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन, राज्य शासन व पालकमंत्र्यांंना निवेदने दिली होती. याप्रश्नी आंदोलनेही केली होती.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्र्यानी रुग्णांना बेड मिळत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ७३ आय.सी.यु. बेड व ३१० आॅक्सिजन व प्रथमोपचार बेड उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ही माहिती चूकीची व खोटी आहे.

आम्ही स्वत: रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यासंदर्भात कॉल सेंटरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून फोन करून व प्रत्यक्ष सांगलीमधील वेगवेगळया दवाखान्यामध्ये जावून चौकशी केली असता कुठेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

पालकमंत्र्यांच्याकडून चूकीची व जनतेची दिशाभूल करण्याची आकडेवारी जाहीर केल्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो. पालकमंत्र्यांनी सांगली जिल्हयातील जनतेची जाहिर माफी मागावी व सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करावेत, अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाSangliसांगलीJayant Patilजयंत पाटील