शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता हे सरकार जनतेला चंद्र-तारे सुद्धा देतो म्हणेल, महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 15:19 IST

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ...

इस्लामपूर : राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणावर घोषणा करीत आहे. येत्या तीन महिन्यात ते चंद्र-तारेही देऊ म्हणतील, असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारला.इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या वाळवा तालुका असंघटित बांधकाम कामगार संघटनेने तालुक्यासह इस्लामपूर व आष्टा शहरातील २ हजार कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आले. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सरपंच संजय पाटील, भगवान पाटील, सभापती संदीप पाटील, संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर चव्हाण, शहराध्यक्ष निवास जाधव, आष्टा शहराध्यक्ष प्रकाश पवार, निवास गायकवाड उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीने प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपण असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केले. कष्ट करणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देताना ऐन संकटात मदतीचा हात देता यावा, हा हेतू होता. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बांधकाम आणि इतर क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कुटुंबांना स्थिरता व सुरक्षितता देण्याचे काम करीत आहे. हे पाहून समाधान वाटते. भविष्यात जे सहकार्य लागेल, ते देत राहू.सुभाषराव सूर्यवंशी म्हणाले, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटीत कष्टकरी भावा-बहिणींना संघटित करून त्यांना शासनाचे विविध लाभ मिळवून देत आहे. राज्यात प्रथम आम्ही मुलीच्या लग्नास ५१ हजार मंजूर करून घेतले. यावेळी शहाजी पाटील, संजय पाटील, पुष्पलता खरात, सागर चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनीता सौंदडे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली.यावेळी बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, खंडेराव जाधव, पुष्पलता खरात, माजी नगरसेवक रणजित मंत्री, कृष्णेचे संचालक संजय पाटील, दिग्विजय पाटील, अरुण कांबळे, शैलेश पाटील, हणमंत माळी, राजकुमार कांबळे, शंकरराव चव्हाण, अनिल पावणे, विलास भिंगार्डे, आयुब हवलदार, गुरुराज माने उपस्थित होते. संपर्क प्रमुख अविनाश गायकवाड यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष विक्रम धुमाळ यांनी आभार मानले.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलMahayutiमहायुती