शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात जयंत पाटील-आनंदराव पवार यांची भेट चर्चेत, राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 17:13 IST

जयंत पाटील यांनी शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. आगामी निवडणुकीतही धनुष्यबाणाची ताकद दाखवू.

इस्लामपूर : येथील आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित येण्याबाबत साशंकता आहे. मात्र शहरात रमजान ईदनिमित्त जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार एकत्रित आले. याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आगामी पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे निश्चित आहे, तर विरोधी विकास आघाडीतील शिवसेनेची भूमिका आजही धनुष्यबाणावर लढण्याची आहे. राज्यातील सत्तेत एकत्र असले तरी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय अद्याप जिल्हाप्रमुख पवार यांनी घेतलेला नाही. शिवजयंतीनिमित्त यल्लम्मा चौकात भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि आनंदराव पवार एकत्र आले. त्यामुळे सद्यस्थितीत पवार विकास आघाडीसोबत असल्याचे दिसत आहे.ही परिस्थिती असतानाच रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी स्वागत कक्ष उभे केले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेने वेगवेगळ्या व्यासपीठावरून शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पवार यांच्याशी जवळीक साधली. जिल्हा बँकेचे संचालक चिमण डांगे यावेळी उपस्थित होते. या तिघांच्या भेटीमुळे शहरात चर्चा सुरू झाली. आनंदराव पवार आज राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार नसले तरी जयंत पाटील मात्र आगामी काळात शिवसेनेचा ‘कार्यक्रम’ करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.दोघे बसून आघाडीचा प्रश्न मिटवू

ईदगाह परिसरात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच नेत्यांनी स्वागत कक्ष उभे केले. तेथे जयंत पाटील व आनंदराव पवार यांची भेट झाली. या भेटीमध्ये पाटील यांनी, ‘वरून दबाव येण्यापेक्षा आपण दोघे बसून इस्लामपुरातील आघाडीचा प्रश्न मिटवू’, असा सबुरीचा सल्ला देत शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्याकडे बघत, ‘बैठकीला बसा’, असा सल्ला दिल्याचे समजते.

जयंत पाटील यांनी शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. मागीलवेळी पालिकेत शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी ‘एन्ट्री’ केली. सध्या आम्ही विकास आघाडीत आहोत. आगामी निवडणुकीतही धनुष्यबाणाची ताकद दाखवू. - आनंदराव पवार, जिल्हा प्रमुख, शिवसेना.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाJayant Patilजयंत पाटील