जाेतिबा शेवाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:45+5:302021-07-01T04:18:45+5:30

ओळ : उमदी (ता. जत) येथे जाेतिबा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते ग्रामस्थांना धान्य वाटप करण्यात आले. ...

Jatiba Shewale's birthday celebrated with various activities | जाेतिबा शेवाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

जाेतिबा शेवाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

ओळ : उमदी (ता. जत) येथे जाेतिबा शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते ग्रामस्थांना धान्य वाटप करण्यात आले.

उमदी : जत तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस जोतिबा दाजी शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त उमदी (ता. जत) येथे राजे ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचे औचित्य साधून गरजुंना धान्य वाटप करण्यात आले. वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी आमदार विक्रम सावंत, माजी सभापती बाबासाहेब कोडग, काँग्रेसचे नेते निवृत्ती शिंदे, बंडा शेवाळे, अनिल शिंदे, रोहन चव्हाण आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कोरोना महामारीत अनेक रुग्णांना रक्त न मिळाल्याने आपला जी. गमवावा लागला. यामुळे जोतिबा शेवाळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून राजे ग्रुप व जीवनरेखा रक्तपेढीतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ५० हून अधिक युवकांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त १०० हून अधिक गरजु कुटुंबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले, तसेच शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावर ५०० हून अधिक झाडे लावण्यात आली. यावेळी प्रणव कुलकर्णी, जी. बी. कुंभार, सचिन ठेंबरे, ऋती वाघदरी, सुजय सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Jatiba Shewale's birthday celebrated with various activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.