शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जतमध्ये शिंदीच्या वनात घटगजानन पाटील ।

By admin | Updated: May 17, 2017 23:23 IST

जतमध्ये शिंदीच्या वनात घटगजानन पाटील ।

लोकमत न्यूज नेटवर्कसंख : दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी पातळी कमी झाल्यामुळे जत पूर्व भागात पडिक व नापीक जमीन वाढली आहे. परिणामी ओढ्याकाठी, शेतीच्या बांधावर, कमी पावसाच्या भागात आढळणारी शिंदीची झाडे कमी झाली आहेत. बोर नदी, ओढ्याकाठी असलेली शिंदीची वने दुर्मिळ होऊ लागली आहेत. त्यामुळे नैसर्गिक शिंदी उत्पादनात मोठी घट झाली आहे.दुष्काळी भागातील शिंदीच्या झाडांना मे महिन्यात फळे येतात. बोर नदीकाठी, ओढ्याकाठी, बांधावर या झाडांचे प्रमाण अधिक आहे. शिंदीच्या फळांना बजूर (शिंदोळ्या) म्हणतात. या झाडापासून नीरा हे सकस पेय मिळते. शिंदीच्या पानापासून चटया, केरसुणी बनवितात. पूर्व भागातील मुचंडी, सिध्दनाथ, जालिहाळ खुर्द, रावळगुंडवाडी, कागनरी, जालिहाळ बुद्रुक, तिकोंडी, करजगी, बोर्गी या गावांमध्ये बोर नदीकाठी, ओढ्याकाठी, शेतीच्या बांधावर या झाडांची संख्या अधिक आहे. ही गावे शिंदीसाठी प्रसिध्द आहेत. शिंदी बनविण्याचा व्यवसाय कर्नाटक व आंध्र प्रदेशमधून आलेले येळगार लोक करतात. पावसाचे प्रमाण गेल्या १० वर्षांपासून कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे. सध्या ही पातळी ७०० ते ८०० फुटांपर्यंत गेली आहे. परिणामी ही झाडे वाळू लागली आहेत.शासनाने शिंदीचा समावेश फळझाडांमध्ये केला आहे. या झाडांची वाढ जलद होते. कमी खर्चात लागवड करता येते. पडिक व नापीक जमिनीच्या ठिकाणी लागवड केल्यास उत्पादन व रोजगार मिळू शकतो. जत पश्चिम भागात ‘म्हैसाळ’चे पाणी आले आहे. ओढ्याकाठी झाडांची लागवड, संवर्धन करणे शक्य आहे. पूर्व भागात वन विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.नीरा : आयुर्वेदिक पेयशिंदीची रोपे काळजीपूर्वक वाढविली की पाच ते सहा वर्षांत झाड तयार होते. शिंदीपासून मिळणारे नीरा हे अत्यंत सकस, आयुर्वेदिक पेय आहे. शरीरातील उष्णता, दाहकता, आम्लपित, मधुमेह यावर हे रामबाण औषध आहे. एक झाड वर्षाला २६० ते ३२० लिटर द्रवरूप नीरा देते.पाणी पातळीसाठी मदतओढ्याकाठी, बांधावर झाडे असल्याने मुळांद्वारे माती मोठ्या प्रमाणात धरली जाते. पाणी पातळी टिकविण्यासाठी ही झाडे मदत करतात.