शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

टर्मरिक सिटी गुलाबी नगरी जयपूरला जोडणार; जयपूर-म्हैसूर विशेष एक्स्प्रेस सांगलीमार्गे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:44 IST

सांगलीतून बुकिंग करण्याचे आवाहन

सांगली : देशाची टर्मरिक सिटी असलेल्या सांगलीला राजस्थानची राजधानी आणि गुलाबी नगरी जयपूर, भारताची सिलिकॉन व्हॅली बंगळुरू आणि राजवाड्यांचे शहर असलेल्या म्हैसूरला विशेष रेल्वेने जोडले जाणार आहे. म्हैसूर-जयपूर विशेष ट्रेन शनिवारपासून (दि. १८) सांगली स्थानकावरून धावणार आहे.राजस्थानच्या लोकांना महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी रेल्वेची मागणी अनेक वर्षांपासून होती. राजस्थानच्या व्यापाऱ्यांना महाराष्ट्रातील सांगली भागात हळद, गूळ, बेदाणा व्यापारासाठी ये-जा करावे लागते.नव्या विशेष रेल्वेमुळे प्रवाशांसाठी राजस्थानहून सांगलीला येणे सोपे होईल. बंगळुरू, जयपूरहून येणाऱ्या प्रवाशांचीही सोय यामुळे होणार आहे. भारतीय रेल्वेने दिवाळीच्या काळात म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस आणि जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस बंगळुरू-सांगली मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आणि तिकीट विक्री चांगली झाली तर भविष्यात ही गाडी नियमित एक्स्प्रेस म्हणून चालविली जाईल. ही गाडी जयपूरला कर्नाटकमधील बेळगावी, हुबळी-धारवाड, दावणगिरी, आरसीकेरी, तुमको या भागांशी जोडली जाईल.

म्हैसूर-जयपूर एक्स्प्रेस (क्र. ०६२३१) अशी धावणार

  • १८ ऑक्टोबर, २५ ऑक्टोबर
  • म्हैसूर : शनिवार रात्री ११:५५
  • बंगळुरू : रविवारी मध्यरात्री २:१०
  • हुबळी : रविवारी सकाळी ९:४०
  • सांगली : रविवार दुपारी ३:४५
  • वडोदरा : सोमवार सकाळी ५:४५
  • अहमदाबाद : सकाळी ७ :२०
  • आबू रोड : सोमवार सकाळी ११:२५
  • फालना : सोमवार दुपारी १२:५०
  • जयपूर : सोमवार सायंकाळी ६:४०

जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस (क्र.०६२३२) अशी धावणार

  • २१ ऑक्टोबर व २८ ऑक्टोबर
  • जयपूर : सकाळी ४ वाजता प्रस्थान
  • फालना : मंगळवार सकाळी ८:५५
  • आबू रोड : मंगळवार सकाळी १०:१५
  • साबरमती (अहमदाबाद) : मंगळवार दुपारी १:२०
  • वडोदरा : मंगळवार दुपारी ४:५२
  • सांगली : बुधवार सकाळी ७:१८
  • हुबळी : बुधवार दुपारी २:२०
  • बंगळुरू : बुधवार रात्री ११:४०
  • मैसूर : गुरुवार सकाळी ३:३०

सांगलीतून बुकिंग करण्याचे आवाहनजयपूरहून सांगली, हुबळी, बंगळुरू, म्हैसूरकडे जाण्यासाठी किंवा परतीच्या प्रवासाचे तिकीट आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲप्लिकेशनवरून बुक करावे. सांगलीतून जाणाऱ्या व सांगलीत येणाऱ्या प्रवाशांनी सांगली स्थानकाचा उल्लेख बुकिंग करताना करावा, असे आवाहन येथील प्रवासी संघटनांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli, turmeric city, connected to Jaipur, Mysore via special train.

Web Summary : Sangli gets direct rail link to Jaipur, Bangalore, and Mysore. The Mysore-Jaipur Express will run via Sangli on select dates. If patronage is good, it may become a regular service. Booking urged from Sangli station.