शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह, आरटीओ कार्यालय कवलापूरलाच...

By admin | Updated: August 5, 2016 02:01 IST

स्थलांतरावर शिक्कामोर्तब : विभागीय आयुक्तांचा अहवाल राज्य शासनाकडे; निधी मिळण्याचे संकेत

सचिन लाड-- सांगली --जिल्हा मध्यवर्ती कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालये कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर स्थलांतर करण्यावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवालही मागवून घेतला आहे. येत्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांना जागेचे वाटप करून इमारत बांधकामास निधी मिळण्याचे संकेत आहेत. कवलापूर येथे नियोजित विमानतळाची दीडशे एकर जागा आहे. याठिकाणी विमानतळ करण्याचा राज्य शासनाने दोनवेळा निर्णय घेतला. दोनवेळा उद्घाटनही केले; पण शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला. अगदी हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर शासनाने नमते घेत विमानतळ करण्याचा निर्णय रद्द केला. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा पडीक आहे. सांगलीत अनेक शासकीय कार्यालये अडगळीच्या ठिकाणी आहेत. त्यांना स्वतंत्र कार्यालय उभारण्यासाठी जागाही नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृह कैद्यांच्या संख्येने खचाखच भरले आहे. सुरक्षेच्यादृष्टीने हे कारागृह शहरातून हलविण्याची गरज आहे. यासाठी कारागृह प्रशासनाने कवलापुरातील जागेची मागणी केली होती. आरटीओ कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. त्यांनीही ३२ एकर जागा देण्याची मागणी केली. त्यानंतर अन्य शासकीय कार्यालयांनीही याच जागेला पसंती दिली. कारागृह, आरटीओसह अनेक शासकीय कार्यालयांनी कवलापुरातील जागेची मागणी करून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना प्रस्ताव सादर केला होता. गायकवाड यांनी हा प्रस्ताव पुढे राज्य शासनाला सादर केला होता. शासनाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांनीही अहवाल सादर केला आहे. अहवालात काय म्हटले आहे, हे समजू शकले नाही. पण ज्या शासकीय कार्यालयांनी जागेची मागणी केली आहे, ती त्यांना देण्यासाठी शासनाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते. शासनाकडून भविष्यात ही जागा मिळू शकते. अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा सुरू आहे. पण त्यांची ताकद कमी पडते. लोकप्रतिनिधींनीही यामध्ये लक्ष घालून पाठपुरावा करण्याची गरज आहे. कारागृहाला गरज जागेचीजागेची सर्वात जास्त गरज कारागृहाला आहे. सध्या कारागृहात चारशेहून अधिक कैदी झाले आहेत. त्यांना ठेवायला जागा नाही, अशी स्थिती आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना कारागृह प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सत्तरहून अधिक कैदी कळंबा व येरवडा कारागृहात हलविले आहेत. अन्यथा येथे पाचशेपेक्षा जादा कैदी झाले असते.