सांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:57 IST2021-06-03T17:55:49+5:302021-06-03T17:57:15+5:30

Agriculture Sector Sangli : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले.

Jaggery, currant and turmeric deals started in Sangli market committee | सांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

सांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

ठळक मुद्देसांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरुनिर्बंध शिथील होताच समितीचे सौदेही सुरु

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले.

लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, गूळ, हळद व बेदाण्याचे सौदेही झाले नाहीत. १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथील होताच समितीने सौदेही सुरु केली. गुरुवारी पहिल्याच दिवशी १ हजार ७७७ क्विंटल राजपुरी हळदीची आवक झाली.

प्रतिक्विंटल कमीतकमी सहा हजार ते कमाल ११ हजार रुपयांचा दर मिळाला. सरासरी दर ८ हजार ७०० रुपये असा राहिला. गूळ सौद्यासाठी ३ हजार ५० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल जास्तीजास्त ३ हजार ७७० दर मिळाला. सरासरी दर ३ हजार ४१० रुपये राहिला.

दरम्यान, सभापती दिनकर पाटील यांनी सागितले की, निर्बंध १०० टक्के रद्द झाले नसल्याने धान्य व इतर व्यवसाय मर्यादीत वेळेतच सुरु राहतील. धान्य बाजार सकाळी सात ते आकरा या वेळेतच चालेल. त्यानंतर फक्त धान्य उतरवून धेण्याचेच काम चालेले. व्यापारी व ग्राहकांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनांना समितीत निर्बंध असतील. फळ मार्केटमध्येही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सौदे सुरु राहतील. ओळकपत्राशिवाय प्रवेश नसेल. बेदाण्याचे सौदे शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत निघणार आहेत.

Web Title: Jaggery, currant and turmeric deals started in Sangli market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.