नागठाणेच्या सरपंचपदी जगन्नाथ थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:59+5:302021-02-17T04:32:59+5:30
वाळवा : नागठाणे (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे जगन्नाथ थोरात यांची, तर उपसरपंचपदी काँग्रेसचे सचिन देसाई यांची निवड झाली. ...

नागठाणेच्या सरपंचपदी जगन्नाथ थोरात
वाळवा : नागठाणे (ता. पलूस) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे जगन्नाथ थोरात यांची, तर उपसरपंचपदी काँग्रेसचे सचिन देसाई यांची निवड झाली.
सरपंच व उपसरपंच निवडीसाठी नूतन ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. यावेळी काँग्रेसचे जगन्नाथ थोरात विरुध्द भाजपचे इंद्रजित पाटील यांचे अर्ज सरपंचपदासाठी दाखल झाले. यात काँग्रेसचे जगन्नाथ थोरात नऊ विरूध्द पाच अशा फरकाने विजयी झाले. उपसरपंच पदासाठी काँग्रेसचे सचिन देसाई विरुध्द भाजपच्या अर्चना जाधव यांच्यात लढत होऊन सचिन देसाई नऊ विरुध्द पाच अशा फरकाने विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दिनेश खाडे यांनी काम पाहिले. त्यांना विस्तार अधिकारी एस. आर. पाटील यांनी सहाय्य केले.
निवडीसाठी जयकर पाटील, बाजीराव मांगलेकर, झाकीर लांडगे, शंकरराव जाधव, पैलवान सुहास माने, पोलीस पाटील दीपक कराडकर, भगवान अडिसरे, रघुनाथ पाटील, महादेव माने, अशोक माने, राजाराम मदने यांनी परिश्रम घेतले. निवडीवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रकाश मांगलेकर यांच्यासह भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : १६ जगन्नाथ थोरात.. १६ सचिन देसाई