सांगली : शहरातील इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात उघड्या असलेल्या घरात प्रवेश करून बहिणीनेच ६० हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली. याप्रकरणी नीलेश मारुती वाघमारे (रा. सातवी गल्ली, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) यांनी नकुसा सुभाष भोरकडे हिच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार, दि. २ रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत हा प्रकार घडला. सोमवारी दिवसभरात वाघमारे यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. यावेळी संशयितेने प्रवेश करून तिजोरीतून ३५ हजार रुपयांची रोकड व २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असा ६० हजार रुपयांचा माल लंपास केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बहिणीनेच मारला भावाच्या घरात डल्ला, सांगलीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 13:45 IST