शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
4
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
5
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
7
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
8
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
9
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
10
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
11
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
12
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
13
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
14
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
15
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
16
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
17
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
18
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
19
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
20
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

जिल्हा परिषदेत नोकरी, तरीही घेतले ‘लाडकी बहीण’चे हप्ते; सांगलीतील यादी प्राप्त, किती महिला..वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 13:45 IST

नागरी सेवा कायद्यानुसारही कारवाई

सांगली : जिल्हा परिषदेत सरकारी नोकरीत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेचे हप्ते घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा १० महिला कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेस प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून या पैशांची वसुली केली जाणार आहे. नागरी सेवा कायद्यानुसारही त्यांच्यावर कारवाईचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांचा शोध महिला व बालविकास विभाग घेत आहे. पहिल्या टप्प्यातील कार्यवाहीत राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या सेवेत असलेल्या १ हजार १८३ महिला कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांची यादी ग्रामविकास विभागाला देण्यात आली आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेतील दहाजणींचा समावेश आहे. त्यांनी सरकारी सेवेत असतानाही लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज केल्याचे आणि लाभ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.या महिला कर्मचारी मुख्यालयासह ग्रामपंचायत, आरोग्य, शिक्षण, कृषी अशा विविध विभागांत सेवेत आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई करायची याचे निर्देश जिल्हा परिषदेला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. पण शासनाच्या धोरणानुसार त्यांच्याकडून पैशांची वसुली केली जाणार आहे. एक वेतनवाढही रोखण्यात येणार आहे.

१२ हप्त्यांत घेतले १.८० लाख, पगारातून वसुली?या महिला कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे १२ हप्ते प्राप्त झाले असून एकूण १ लाख ८० हजार रुपये मिळाले आहेत. त्यांच्या वेतनातून पैशांची वसुली होणार आहे. ती समान हप्त्यांत करायची की, प्रत्येक महिन्याला १५०० रुपये वेतनातून वळते करुन घ्यायचे याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून येण्याची शक्यता आहे. या महिला सर्व पैसे एकाचवेळी शासनाला जमा करू शकतात, असाही निर्णय होण्याची शक्यता आहे.

सहा महिला साताऱ्याच्यासांगली जिल्हा परिषदेला १६ महिला कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली. प्रशासनाने त्यांच्या वेतन कार्यालयाची चौकशी केली असता १० महिला सांगली जिल्हा परिषदेच्या तर सहा महिला कर्मचारी साताऱ्याच्या असल्याचे निष्पन्न झाले. तसे शासनाला कळविण्यात येणार आहे.यातील काही महिला योजनेचा लाभ घेताना सरकारी नोकरीत नसल्याची शक्यता आहे. लाभ सुरू झाल्यावर त्यांना नोकरी लागली, पण त्यांनी योजनेतून नाव वगळण्यासाठी अर्ज केला नाही, अशीही शक्यता आहे.

महिला व बालविकास विभागाकडून १० महिला कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. जिल्हाभरातील विविध कार्यालयांत त्या सेवेत आहेत. त्यांच्याबाबत शासनाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)