विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, हेच शिक्षकांचे कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:19+5:302021-09-10T04:33:19+5:30
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा शिक्षण संकुलात आयाेजित शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक संघाचे ...

विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, हेच शिक्षकांचे कर्तव्य
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा शिक्षण संकुलात आयाेजित शिक्षक सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. नरके म्हणाले, शिक्षकांची भूमिका ही कालपरत्वे बदलत असते. समाजाच्या गरजा विचारात घेऊन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला संधी देण्याची भूमिका घ्यावी लागते. शैक्षणिक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करावे लागतात. शिक्षण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांना समोर येणाऱ्या आवाहनांना सक्षमपणे तोंड देत यशस्वी जीवन जगण्यासाठी उपयोगी पडते.
डॉ. प्रताप पाटील म्हणाले, शिक्षण व्यवस्थेत उर्जितावस्था आणण्यासाठी शिक्षकांनी काळ-वेळेचे भान न ठेवता अधिक परिश्रम घेणे गरजेचे आहे.
कार्यक्रमासाठी जयदत्त योग प्रबोधिनीच्या संचालिका डॉ. प्रज्ञा पाटील व नंदा अदने यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आप्पासाहेब खराडे, अमर कोरेगावकर, ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ, विलास पोळ, माजी मुख्याध्यापक रमेश चांदणे उपस्थित होते. डॉ. सूरज चौगुले यांनी स्वागत केले. डॉ. भारत उपाध्ये यांनी आभार मानले.