शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वजित यांच्या प्रचारात विकासकामांचेच मुद्दे --:टीका-टिपणीला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:06 IST

‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणार नाही’, असा विश्वास

ठळक मुद्देसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून पलूस-कडेगाव तालुक्यात विकासकामे केल्याचा दावा

अशुतोष कस्तुरे ।पलूस : कोणत्याही प्रकारची टीका-टिप्पणी न करता फक्त विकासाचे आणि आपण केलेल्या कामाचे मुद्दे घेऊन आमदार विश्वजित कदम यांचा प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. ‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणार नाही’, असा विश्वास आ. विश्वजित कदम प्रचार करताना देत आहेत.

आमदार डॉ. कदम यांनी पलूस तालुक्यातील बहुतेक सर्व गावे पिंजून काढली आहेत. त्यांच्यासोबत डॉ. शिवाजीराव कदम, आमदार मोहनराव कदम, शांताराम कदम, डॉ. जितेश कदम, महेंद्र लाड यांच्यासह सर्व कदम कुटुंबीयांनी कंबर कसली आहे.

डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कामाची माहिती आणि या मतदार संघाला कदम यांनी दिलेली उभारी, येथील उद्योग, व्यवसाय, एमआयडीसी आणताना केलेले प्रयत्न आणि त्याच्या यशस्वीतेनंतर झालेली प्रगती, विविध पाणी योजनांच्या माध्यमातून येथील शेतीत आलेली हरितक्रांती, सोनहिरा कारखाना, भारती विद्यापीठ, रुग्णालय यांच्या माध्यमातून सामान्यांच्या कामांना प्राधान्य देण्यासाठीची तत्परता या सर्व गोष्टी प्रचाराचे मुद्दे ठरले आहेत.कोणत्याही पक्षावर टीका-टिपणी करणे त्याला बगल देत आपण केलेल्या कामांचा प्रचार विश्वजित कदम आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.प्रत्येक बुथनिहाय, वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन, प्रत्येकाला जबाबदारी दिली आहे. कोणीही गाफील राहू नये, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याकडून वैयक्तिक माहिती घेतली जात आहे, असे महेंद्र लाड यांनी सांगितले. 

येथील जनतेने डॉ. पतंगराव कदम यांना जसा नेहमी भरभरून आशीर्वाद दिला होता, तसाच ते मलाही देतील आणि ऐतिहासिक मताधिक्याने यावेळी मला निवडून आणतील.- विश्वजित कदमकसलीही काळजी करू नका.. मी नेहमी तुमच्यासोबत असेन, अशा शब्दात आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी प्रचारादरम्यान आजीबार्इंना आश्वस्त केले.

टॅग्स :Sangliसांगलीcongressकाँग्रेसVidhan Parishadविधान परिषद