शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर इस्लामपूरचे राजकारण पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 14:37 IST

सर्वपक्षीय नाराजीचा सूर

अशोक पाटीलइस्लामपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यानंतर संपूर्ण वाळवा तालुका आणि इस्लामपूर परिसरातील राजकारण पेटले आहे. सर्वपक्षीय नाराजीचा सूर उमटत असतानाच भाजपमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही पडळकरांच्या वक्तव्याबद्दल पक्षातील वरिष्ठांकडे तक्रारीचा सूर आळवला आहे.वाळवा तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या नावाचा पडळकर यांनी गुरुवारी जतमध्ये एकेरी शब्दांत उल्लेख करीत जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पडळकर यांच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वक्तव्याबाबत नाराजी दर्शविली. पडळकर यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश नेतेसुद्धा संभ्रमात आहेत.

वाचा- तुझी चड्डीसुद्धा ठेवणार नाही; बापू बिरूंच्या मुलाचा गोपीचंद पडळकरांना थेट इशाराइस्लामपूर मतदारसंघातील माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे सध्या भाजपमध्ये आहेत. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांना एकेकाळी ओळखले जात होते. ते सध्या भाजपमध्ये असून राज्यात धनगर समाजाचे नेतृत्व करीत आहेत. भाजपला चिमण डांगे यांच्यासारखे नेतृत्व इस्लामपूर मतदारसंघास मिळाले आहे. पडळकर यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या समर्थकांतही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. 

सर्वच नेत्यांनी एकमेकांचा आदर करावा. राजकारण आणि समाजकारणामध्ये काम करणारे व्यक्तिमत्त्व समाजाचे आदर्श असतात. अलीकडील राजकारणात ‘अरे’ ला ‘का रे’ म्हणणारे नेते निर्माण झाले आहेत. याची कारणे राजकारण्यांनी शोधावीत. महाराष्ट्राचे राजकारण विकासात्मक होते. राजकारणातील प्रस्थापित विस्थापितांचा आवाज दाबण्याचे काम करतात. त्यामुळेच राजकीय वातावरणात अशी परिस्थिती उद्भवत आहे. सर्वच नेत्यांनी आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा. - सदाभाऊ खोत, आमदार, भाजप पुरस्कृत­