शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेत आयपीएल क्रिकेटवर बेटिंग घेणारा बुकीस अटकेत, पोलिसांच्या कारवाईमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:35 IST

मिरजेत प्रत्येक बुकींच्या स्वतंत्र ॲपवरून बेटिंग सुरू

मिरज : मिरजेत रमजान जब्बार सतारमेकर (वय ३५, रा. शनिवार पेठ, सतारमेकर गल्ली, मिरज) या बेटिंग बुकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाइल असा ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. आयपीएल क्रिकेटवर मिरजेत जोरदार बेटिंग सुरू असून पोलिसांच्या या कारवाईमुळे बुकींमध्ये खळबळ उडाली होती.स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सहायक निरीक्षक पंकज पवार व हवालदार संजय कांबळे यांना गुरुवारी रात्री मिरजेत शनिवार पेठेत नागोबा कट्ट्याजवळ संगीत महल या दुकानाच्या बाजूस रमजान सतारमेकर हा बुकी मोबाइलवर आयपीएल क्रिकेटच्या गुजरात टायटन्स विरुध्द पंजाब किंग्ज या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने तेथे जाऊन रमजान सतारमेकर यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची झडती घेण्यात आली. त्याच्या मोबाइलमध्ये क्रिकेट बेटिंगचे क्रिकेट लाइन गुरू ॲप्लिकेशन चालू स्थितीत व खिशात १८ हजार रोख रक्कम सापडली. त्यास मोबाइल ॲप्लिकेशन व रोख रकमेबाबत विचारणा केली असता, क्रिकेट लाइन गुरू या ॲप्लिकेशनवर आयपीएल क्रिकेटच्या गुजरात टायटन्स विरुध्द पंजाब किंग्ज सामन्यात पहिल्या ५ ओव्हरपर्यंत होणाऱ्या धावा व सामन्यात विजेत्या व पराभूत संघावर ग्राहकांकडून पैसे घेऊन ॲप्लिकेशनमध्ये असलेल्या रेटवर सट्टा घेत असल्याची कबुली दिली. आरोपी रमजान याच्यासह रोख रक्कम व मोबाइल मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात देऊन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेत आयपीएल क्रिकेट बेटिंगवर दररोज लाखोंची उलाढाल सुरू असून आयपीएल क्रिकेट बेटिंग बुकींसाठी पर्वणीच ठरले आहे. मिरजेत प्रत्येक बुकींच्या स्वतंत्र ॲपवरून बेटिंग सुरू आहे. ॲपवर बेटिंग खेळण्यासाठी एजंटाकडे रोख पैसे भरून ग्राहकाला आयडी पासवर्ड देण्यात येतो. या आयडीवरून प्रत्येक सामन्यावर बेटिंग सुरू आहे. ॲपशिवाय हॉटलाइनवरून थेट बुकींकडे बेटिंग लावण्यात येते. यातून प्रत्येक सामन्यावर लाखोंची उलाढाल होते. जिल्ह्यासह लगतच्या बेळगांव जिल्ह्यातील क्रिकेट बेटिंगचेही नियंत्रण मिरजेतून होते. गतवर्षी कर्नाटक पोलिसांनी मिरजेत छापा टाकून मिरजेतील बुकींवर कारवाई केली होती. मिरजेत आठ ते दहा बेटिंग असून त्यापैकी एकावर कारवाई होताच अन्य बुकी भूमिगत झाले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीIPLआयपीएल २०२४Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmiraj-acमिरज