मिरजेत कोरोना रुग्णालयाच्या नावावर गुंतवणूकदारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:43+5:302021-09-22T04:29:43+5:30

रुग्णालयास औषध पुरवठा करणाऱ्यांची लाखोंची बिले अडकली असून, त्यांना दिलेले धनादेश वटलेले नाहीत. चार महिन्यांपूर्वी हैदराबाद येथून मिरजेत ...

Investors gang in the name of Miraj Corona Hospital | मिरजेत कोरोना रुग्णालयाच्या नावावर गुंतवणूकदारांना गंडा

मिरजेत कोरोना रुग्णालयाच्या नावावर गुंतवणूकदारांना गंडा

रुग्णालयास औषध पुरवठा करणाऱ्यांची लाखोंची बिले अडकली असून, त्यांना दिलेले धनादेश वटलेले नाहीत. चार महिन्यांपूर्वी हैदराबाद येथून मिरजेत आलेल्या बाबाने कोविड सेंटरमध्ये गुंतवणुकीवर दुप्पट व तिप्पट परताव्याचे आमिष दाखविले होते. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी सलगी करून बाबाने महापालिकेकडून कोविड सेंटरची परवानगी मिळविली. त्याच्या कोविड सेंटरमध्ये काहींनी ५ ते २५ लाखांपर्यंत गुंतवणूक केली आहे. मात्र पैसे परत देण्यापूर्वीच या भामट्याने पलायन केले. त्याने हैदराबाद येथेही अनेकांची फसवणूक केल्याचे समजल्याने गुंतवणूकदार व वैद्यकीय साहित्य पुरवठादारांत खळबळ उडाली आहे.

भामट्याने काही दिवसांपूर्वी कुपवाड येथेही रुग्णालय सुरू केले होते. मात्र चार दिवसांपूर्वी मिरजेतील रुग्ण अन्यत्र हलवून कोरोना रुग्णालय बंद करण्यात आले आहे. सांगली-मिरजेतील वैद्यकीय साहित्य पुरवठादारांनी लाखो रुपयांची औषधे व उपकरणे दिली होती. रुग्णालयात गेल्या चार महिन्यांत शंभरावर रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. मात्र आता रुग्णालयचालक बाबा गायब झाल्याने गुंतवणूकदार व पुरवठादार पोलिसांत तक्रार करण्याच्या पवित्र्यात आहेत.

चाैकट

राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने परवाना

मिरजेतील ॲपेक्स कोविड रुग्णालयाचा कारभार गाजत असताना, आणखी एका कोविड सेंटरच्या नावावर फसवणुकीचा प्रकार घडल्याने महापालिका प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्यांना राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीने कोविड सेंटर सुरू करण्यास परवाना मिळाल्याची चर्चा आहे.

Web Title: Investors gang in the name of Miraj Corona Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.