शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

पूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु व पाणी पुरवठा करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 5:26 PM

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सांगलीतील २६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त जनतेला शुद्ध व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले दिल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना रास्त दराने जीवनावश्यक वस्तु व पाणी पुरवठा करण्याचे आवाहनअन्न व औषध प्रशासनतर्फे सांगलीतील २६ आस्थापनांची तपासणी

सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे सांगलीतील २६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी पूरग्रस्त जनतेला शुद्ध व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले दिल्या. योग्य दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू पाणी व दूध योग्य त्या किंमतीने विकल्यास आस्थापना सील केल्या जातील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेनुसार व सहआयुक्त पुणे श्री. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके नेमण्यात आली आहेत.

या पथकांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी मंगलमूर्ती वॉटर सप्लाय (खणभाग सांगली), रेणुका वॉटर सप्लाय (एमआयडीसी मिरज), राम भाईजान पाणी विक्रेता (शिवाजी रोड मिरज), शिरगावे डेअरी (80 फुटी रोड सांगली) अजिंक्यन पाणी सेंटर (हसनी आश्रम सांगली) मधुर शुद्ध पेयजल (गव्हर्मेंट कॉलेज सांगली), गणेश ट्रेडर्स (महालक्ष्मी बस स्टॉप गव्हर्नमेंट कॉलनी सांगली) शिवगंगा ॲक्वा सर्व्हिसेस (शंभर फुटी रोड सांगली) स्वास्थ्य जन मिशन (जुना कुपवाड रोड, सांगली), रामकृष्ण विवेकानंद अध्यात्मिक सेवा संस्था (कुपवाड रोड सांगली), अहिल्यादेवी शुद्ध पेयजल केंद्र (आंबेडकर रोड सांगली) शुद्ध पेयजल (रोटरी क्लब सांगली), श्री, ॲक्वा (आप्पासाहेब पाटील नगर, सांगली) कृष्णा वॉटर सप्लाय (रामकृष्ण परमहंस सोसायटी सांगली) अभिजीत किराणा अँड जनरल स्टोअर्स (गव्हर्नमेंट कॉलनी सांगली) आरोही वॉटर सर्व्हिसेस (80 फुटी रोड सांगली), रामकृष्ण वॉटर एटीएम (सांगली रेल्वे स्टेशन जवळ), केदारनाथ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस्‌ (विश्रामबाग सांगली) थोटे मिल्क सप्लायर्स (विश्रामबाग सांगली) कृष्णाई आर.ओ. वॉटर सप्लायर्स, (सुभाषनगर मिरज), सी. एस. के. एल. ग्रुप वॉटर सप्लायर (सुभाषनगर मिरज), तुळजाई ॲक्वा फिल्टर (सुभाषनगर, मिरज), समर्थ ॲक्वा (शनिवार पेठ मिरज) एल. के. ट्रस्ट (जी. एम. मराठे इंडस्ट्रीअल इस्टेट मिरज) दत्तमंदिर ट्रस्ट वॉटर फिल्टर (दत्त कॉलनी, मालगाव रोज मिरज), यादव किराणा स्टोअर्स (सुभाषनगर मिरज) या आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु. आ. चौगुले, द. ह. कोळी, सु. मा. दांगट, र. ल. महाजन, अ. भु. कोळी, श्रीमती मे. स. पवार, सु. स. हाके, नमुना सहाय्यक तानाजी कवळे यांनी ही कार्यवाही केली.

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारीSangliसांगली