शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

राज्यभरात ३५९ दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 13:31 IST

दिव्यांग कल्याण आयुक्तांचा आदेश; सांगलीत ५, कोल्हापुरात ८, साताऱ्यात १२ कर्मचारी

सांगली : कथित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिच्या दिव्यांग प्रमाणपत्रामधील बोगसगिरी उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रभरात चौकशी सत्र सुरू झाले आहे. दिव्यांगांसाठीच्या राखीव जागेवर नोकरी मिळविलेल्या ३५९ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसा आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.यासंदर्भात ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी शासनाकडे चौकशीची मागणी केली होती. राज्यभरातील कथित बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी त्यांनी शासनाला दिली असून, त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील काही कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बोगस उमेदवारांमुळे दिव्यांगांवर अन्याय होत असून, ते नोकरीपासून वंचित राहत आहेत, त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या धर्तीवर दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी मध्यवर्ती समिती स्थापन करण्याची मागणी कडू यांनी केली आहे.कडू यांनी १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविले होते, त्यातून शासकीय व निमशासकीय विभागांत ३५९ बोगस उमेदवार आढळले आहेत. ही यादी त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे दिली. त्यानुसार आयुक्तांनी यादीतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

साताऱ्यात १२, कोल्हापुरात आठ संशयित प्रमाणपत्रेबच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला सादर केलेल्या यादीनुसार सातारा जिल्ह्यात १२, कोल्हापूर जिल्ह्यात आठ व सांगली जिल्ह्यात पाच दिव्यांग शासकीय व निमशासकीय सेवेत आहेत. त्यांची दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय आहे. कृषी, महसूल, उपप्रादेशिक परिवहन, आदी विभागांत ते कार्यरत आहेत.

शासकीय, निमशासकीय विभागांत गेल्या काही वर्षांत दिव्यांग कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिव्यांगांसाठीच्या सवलतींचा ते लाभही घेत आहेत. त्यांच्या कायमस्वरूपी दिव्यांग प्रमाणपत्रांविषयी शंका येण्यासारखी स्थिती आहे. -रवींद्र सोनवणे, अध्यक्ष, प्रहार दिव्यांग शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिकारी संघटना

टॅग्स :SangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्र