काळाबाजार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:47+5:302021-05-01T04:25:47+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना काही रुग्णालयांकडून नातेवाइकांची लूट सुरू आहे. रेमडेसिविरचाही काळाबाजार केला जात आहे. जिल्हा ...

Investigate black market hospitals | काळाबाजार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करा

काळाबाजार करणाऱ्या रुग्णालयांची तपासणी करा

सांगली : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना काही रुग्णालयांकडून नातेवाइकांची लूट सुरू आहे. रेमडेसिविरचाही काळाबाजार केला जात आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णालयांवर धाडी टाकून तपासणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, कोरोनाच्या साथीत जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन आपापल्या परीने काम करत आहे. कोरोनाबाधितांचे जीव वाचविण्यासाठी साऱ्यांची धडपड सुरू आहे. चांगले उपचार मिळावेत यासाठी यंत्रणा दिवसरात्र राबत आहे. अशातच काही रुग्णालयाचा अनुभव मात्र फारच वाईट आहे. काही कोविड सेंटरमध्ये जादा बिले आकारून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची लूट सुरू आहे. रेडमेसिविरचा तुटवडा असताना साठा करून वीस ते पंचवीस हजार रुपयांना काळाबाजार विकले जात आहे. त्यासाठी कोविड सेंटरवर धाडी टाकून त्याची तपासणी करण्याची गरज आहे.

नियमांचे उल्लंघन, जादा बिलाची आकारणी, रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे रुग्णालये तातडीने बंद करण्यात यावी तसेच रेमडेसिविरचे वितरण नियमानुसार होते की नाही, याची तपासणी करण्यात यावी. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरचा काळाबाजार उघडकीस आला आहे. त्याची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Investigate black market hospitals