शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, १९ दुचाकी जप्त; सांगली शहर पोलिसांची कामगिरी

By घनशाम नवाथे | Updated: May 4, 2024 22:01 IST

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता.

सांगली : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी चोरून त्याचा इंजिन व चेसीस क्रमांक खोडून विक्री करणारी टोळी सांगली शहर पोलिसांनी जेरबंद केली. टोळीतील विजय पुंडलिक माने (वय ४०, रा. उमाजी नाईकनगर, दानोळी, ता. शिरोळ), मुऱ्याप्पा नरसिंग हाबगोंडे (वय ३७, रा. जिरग्याळ, ता. जत), अन्सार अक्रम बुराण (वय २१, रा. एपीजे अब्दुल कलाम चौक, कागवाड, जि. बेळगाव) तिघांकडून १९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित विजय, मुऱ्याप्पा आणि अन्सार या तिघांनी जिल्ह्यात वेगवेगळ्या भागांत चोरलेल्या दुचाकी महाराष्ट्र-कनार्टक सीमा भागात बाँड पेपरवर तसेच रोखीने कमी किमतीत विक्री करण्याचा उद्योग सुरू केला होता. दुचाकीच्या इंजिन व चेसीस क्रमांकावर ग्राईंडर फिरवून क्रमांक खोडून दुचाकी विक्री करत होते. तिघांच्या टोळीने अशा अनेक दुचाकी विक्री केल्या होत्या. तिघे जण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी सांगलीतील आकाशवाणी केंद्राजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील संतोष गळवे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा तिघे जण मोपेड (एमएच १० एपी ९३५६) घेऊन थांबल्याचे दिसले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुचाकी चोरून त्या विक्री करत असल्याची कबुली दिली. उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने खोलवर तपास करत चोरीस केलेल्या आणखी १९ दुचाकी जप्त केल्या. या जप्त केलेल्या दुचाकी कोठून चोरल्या त्याचा तपास केला जात आहे.गुन्हे प्रकटीकरणचे उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, सचिन शिंदे, मच्छिंद्र बर्डे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, उपअधीक्षक जाधव यांनी या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले.

‘शहर पोलिसांनी टोळी पकडून १९ दुचाकी जप्त करण्याची मोठी कामगिरी केली आहे. यापुढेही या पथकाने उकल न झालेले गुन्हे उघडकीस आणावेत. तसेच नागरिकांनी दुचाकीला डबल लॉक, सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावी.’-संदीप घुगे, पोलिस अधीक्षक, सांगली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर