शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त, संशयित जत, सोलापूरचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:42 IST

सांगली येथे तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले.

सांगली : तेलंगणा, कर्नाटकसह सांगली जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १० लाख ३१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीकडून विविध पोलिस ठाण्यांत दाखल तेरा गुन्हे उघडकीस आले आहेत.आकाश कल्लाप्पा काळे (वय २७, रा. एकतानगर, सातारा रस्ता, जत, जि. सांगली ), सचिन अभिमान काळे (३२, रा. यल्लमावाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), दत्ता संपत चव्हाण (५४, रा. एकतानगर, जत) आणि गोविंद राजू काळे (२८, रा. उमराणी रस्ता, जत) अशी संशयितांची नावे आहेत.याबाबत माहिती अशी की, काही दिवसांपासून जिल्ह्यातील घरफोड्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. इस्लामपूर येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर, सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलिस अंमलदार प्रमोद साखरपे, संजय पाटील आणि हणमंत लोहार यांना खबऱ्यांमार्फत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चारही संशयितांची माहिती मिळाली.पथकाने चौघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिस तपासात संशयित आकाश काळे याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडी करण्याकरिता चौघेजण चारचाकीचा (क्र. एमएच १२-पीझेड २१९८) वापर करीत होते.

चारही गुन्हेगारांनी इस्लामपूर, आटपाडी, विटा, कडेगाव, पेठवडगाव तसेच तेलंगणा आणि कर्नाटक राज्यात घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीची चारचाकी, ५ लाख १८ हजारांचे ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १३ हजारांचे चांदीचे दागिने तसेच घरफोडीसाठी वापरण्यात येणारे कटावणी, लोखंडी पाना, स्कू ड्रायव्हर आदी साहित्य हस्तगत केले.

संशयित रेकाॅर्डवरील गुन्हेगारएलसीबीने अटक केलेले चारही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाणे तसेच कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात दरोडा, घरफोडी, चोरी, मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.