शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाळत ठेवून सांगलीत टाकला दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; सहा जण फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 11:57 IST

संशयित नऊ दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईक

सांगली : शहरातील कर्नाळ रस्त्यावरील बंगल्यावर दरोडा टाकून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. या दरोड्यात अहमदनगर, औरंगाबाद येथील तीन संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अजून सहा संशयित फरार असून ते मध्य प्रदेशातील असल्याचे पोलिस अधीक्षक डाॅ. बसवराज तेली यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.अनिल ऊर्फ अन्या युवरा पिंपळे (वय ४९, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर), तुकाराम भीमराव घोरवडे (५४, रा. उंडे वस्ती, मातापूर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर), दाजी धनराज सोळंके (३६, रा. हरसूल गायरान, लासूर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.शहरातील कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर येथे २३ डिसेंबरच्या मध्यरात्री आशिष चिंचवाडे यांच्या बंगल्यावर दरोडा पडला होता. संशयितांनी आशिष यांचे हात बांधून आईला ठार मारण्याची धमकी देत ३ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.या दरोड्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलिस ठाण्याची पथके नियुक्त करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. खबऱ्यामार्फत हा दरोडा अहमदनगर, औरंगाबाद येथील संशयितांनी केल्याची माहिती मिळाली.

एलसीबीच्या पथकाने श्रीरामपूर पोलिसांच्या मदतीने पिंपळे, घोरवडे, तर औरंगाबाद पोलिसांच्या मदतीने सोळंके याला अटक केली. या गुन्ह्यात आणखी सहा जणांचा समावेश आहे. ते मध्य प्रदेशमधील असून, ९९ ग्रॅम वजनाचे पाच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. अजून दोन लाखांची रोकड हस्तगत करण्यात येणार असल्याचे अधीक्षक तेली यांनी सांगितले.

पाळत ठेवून दरोडाअटक केलेल्या तिघांसह सहा जण महाराष्ट्र एक्स्प्रेसने सांगलीत आले. रेल्वे स्थानकावरून ते बसस्थानकात आले. तिथे वेगवेगळे ग्रुप करून घरफोडीसाठी बंगला शोधण्यास सुरुवात केली. दत्तनगर येथील चिंचवाडे यांच्या बंगल्यावर पाळत ठेवली. रात्री नऊ जणांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसत चोरी केली.

संशयित एकमेकांचे नातलगसंशयित नऊ दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईक आहेत. नगर, औरंगाबाद, मध्य प्रदेशमधील नातेवाईक एकत्र येऊन दरोडा टाकत होते. यातील संशयित तुकाराम घोरवडे मध्य प्रदेशमधील साडेसहा वर्षे तुरुंगात होता. आठ महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस