शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींचा अवमान: भाजपच्या खासदारांकडून संभाजी भिडेंचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 16:01 IST

समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये

सांगली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. सत्य व अहिंसेच्या मार्गाचा पुरस्कार करणारे महात्मा गांधी भारतातच नव्हे, तर जगात पूजनीय आहेत. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानाचा निषेध करतो, असे भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले की, महात्मा गांधी यांची बदनामी, अपमान करणाऱ्यांचा प्रयत्न निंदनीय आहे. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान व त्यांच्या तत्त्वांचा जगाने केलेला स्वीकार पाहता त्यांच्याबद्दल अवमानकारक बोलणे अयोग्य आहे. समाजात अशा प्रकारातून दुही पसरविण्याचे काम कोणी करू नये.टेंभू योजनेबाबत ते म्हणाले की, टेंभूची विस्तारित उपसा सिंचन योजना ७३७० कोटींची असून यात सांगली जिल्ह्यातील २४०० कोटींच्या कामांचा समावेश आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावास येत्या आठ दिवसांत शासनाची मंजुरी मिळेल. जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील गावांना योजनेचा लाभ होणार आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना टंचाई संपेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.

लॉजिस्टिक पार्कसाठी अडचण नाहीखासदार म्हणाले की, मल्टीलॉजिस्टिक पार्क मिरज तालुक्यातील सलगरे येथेच होणार आहे. हा विषय जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे नसून नॅशनल हायवे ॲथॉरिटीकडे आहे. या पोर्टसाठी सलगरे येथील ५५० ते ६०० एकर जमीन राज्य शासन एमआयडीसीकडे हस्तांतरित करणार आहे. ही जागा एका मागासवर्गीय संस्थेला एक वर्षाच्या कराराने दिली होती. कराराची मुदत संपली असून संस्था अवसायनात निघाली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीBJPभाजपाMember of parliamentखासदार